डोक्यात दगड टाकुन ठार मारले चासनळी तील दोघांना अटक
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
दि. २१ मे २०२५ रोजी येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत सत्यगाव ते महालखेडा जाणारे
रोडलगत असलेल्या ऊसाचे शेतात एका युवकाचा मृतदेह आढळुन आला होता. सदर मयत युवक हा
यातील मयतास कोणीतरी अज्ञात आरोपीनी डोक्यावर व तोंडावर कशाचे तरी सहाय्याने मारून गंभीर
जखमी करून जिवे ठार मारले म्हणुन येवला तालुका पोलीस ठाणेस गुरनं २०७/२०२५ भा. न्या. सं. कलम
१०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक . बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक
ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांनी सदर घटनेचा
आढावा घेवुन नमुद खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी तपास पथकांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर व येवला तालुका पो.स्टे. चे पोनि . संदिप मंडलीक
यांचे पथकांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून यातील मयत इसम नामे संतोष दत्तात्रय शेळके, वय
२७, रा. दहिवाडी, ता. सिन्नर याचे दैनंदिन कामकाज व राहणीमानाबाबत गुप्त बातमीदारांकडे माहिती घेतली.
घटनेच्या दिवशी सायंकाळचे सुमारास मयत हा त्याचे मोटर सायकलवर इतर दोन इसमांसोबत
वाकद - शिरवाडे, ता. येवला गावचे दिशेने गेला असल्याचे समजले होते. त्यानुसार तपासाची चक्रे फिरवुन
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने संशयीत नामे १) विशाल रतन बागले, वय १९, रा. चासनळी, ता.
कोपरगाव, जि. अहिल्यानगर व २) गणेश भगवान सोनवणे, वय २५, रा. चासनळी, ता. कोपरगाव, जि.
अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले दोन्ही संशयीतांना वरील गुन्हयाचे अनुषंगाने विश्वासात
घेवुन सखोल चौकशी केली असता, त्यांनी दोघांनी मिळुन घटनेच्या दिवशी रात्रीचे सुमारास मयतास एकांतात
घेवुन जावून, त्याचे डोक्यात दगड टाकुन, अंगावर दगडाने जबर दुखापत करून जिवे ठार मारले असल्याची
कबुली दिली आहे. सदर खुनाचा गुन्हा हा यातील आरोपीतांनी पुर्ववैमनस्यातून केला असल्याचे तपासात
समोर आले असून सदर आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासकामी येवला तालुका पोलीस ठाणेस हजर करण्यात
आले आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक
ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, उपविभागीय
पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, येवला तालुका पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक . संदिप मंडलीक,
तसेच स्थागुशाचे पथकातील सपोनि संदेश पवार, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे,
सुधाकर बागुल, योगिता काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, विशाल आव्हाड, चापोना रविंद्र गवळी,
तसेच येवला तालुका पो.स्टे. चे पोउनि प्रल्हाद पवार, पोहवा राजेंद्र पाटील, पोना सचिन वैरागर, सागर
बनकर, पंकज शिंदे यांचे पथकाने वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.





