ब्राम्हणगाव येथे भव्य रक्तदानाचे आयोजन करुन संयुक्त जयंती साजरी
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने ब्राम्हणगाव येथे भव्य रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते.सध्या महाराष्ट्रामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याने छत्रपती संभाजीनगर येथील लायन्स क्लब च्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये ब्रह्मणगाव पंचक्रोशीतील २९ रक्तदात्यांनी रक्तदान केले व ह्या दानाच्या महायज्ञामध्ये सहभाग नोंदवून सामाजिक उत्तरदायित्व निभावत संयुक्त जयंती साजरी केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक निवृत्ती बनकर , कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रावण आसणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ओबीसी सेल चे कोपरगाव तालुकाध्यक्ष राहुल सोनवणे , ब्राम्हणगावचे सरपंच अनुराग येवले, विनोद सोनवणे , विठ्ठल आसणे, जगन आहेर सह ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. लायन्स ब्लड बँकेचे प्रमुख शामराव सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले.
याशिबिरात रक्तदानासाठी
श्रावण आसणे, चेतन बनकर ,साईनाथ आहेर ,राहुल सोनवणे ,विठ्ठल सोनवणे ,विनोद सोनवणे,दीपक महाजन ,बाळासाहेब गंगावणे ,रुपेश सोनवणे,सुनील नाईक ,सतीश मोरे ,पांडुरंग सोनवणे ,अनुराग येवले,नानासाहेब शिंदे, भिकाजी तांबे ,राजेंद्र सोनवणे ,संदीप बनकर ,
संजय वाबळे ,वेदांत सोनवणे,भाऊसाहेब सोनवणे ,अभिजीत सोनवणे ,अमोल बनकर ,प्रतीक माळी ,लक्ष्मण बनकर ,शांताराम बनकर, संजय साबळे ,अनिल जगधने , विक्रांत आसने ,राजेंद्र बंड आदींनी सहभाग नोंदवत रक्तदान केले.






