कोपरगांवात आंबेडकर जयंती मिरवणुकीस गालबोट,
दोन गटात मारामारी तिघे जखमी
कोपरगांव ( लक्ष्मण वावरै )
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत शिंदे व पाटोळे गटातील कार्यकर्त्यात मिरवणुकीत धक्का का दिला या कारणावरुन झालेल्या मारामारीत चॉपर व इतर धारदार शस्त्रांचा वापर झाल्याने तिघे जखमी झाल्याची घटना घडली असून परस्परविरोधी फिर्यादी कोपरगांव पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून दहा ते बारा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आंबेडकर जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीस गालबोट लागले आहे. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
या संबंधी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की दि 14 एप्रिल रोजी रात्री 11 वा. दरम्यान अनिल सुधाकर रणवरे रा.सुभाषनगर कोपरगांव याचे घरासमोरुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक जात असतांना संजय साठे रा.सुभाषनगर कोपरगांव याने धक्का दिल्याने आरोपी रोहित बाबुराव डोखे, सुमित बाबुराव डोखे, अनिल सुधाकर रणवरे, गणेश सुधाकर रणवरे व संजय साठे यांनी फिर्यादी शुभम साहेबराव शिंदे व योगेश संजय शिंदे यांना वार्इट वार्इट शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व अनिल रणवरे याने फिर्यादी शुभम शिंदे यास तुमची एकएकाची खुमखुमी कायमची मिटवतो,तुमच लय झाल असे म्हणून वार्इट वार्इट शिवीगाळ केली व फिर्यादी व साक्षीदार योगेश यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने डोक्यात व पोटात चॉपरने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद वरील आरोपींविरुद्ध शुभम शिंदे याने कोपरगांव पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी पोलीसांनी गु र नं 184/25 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तर विजय भास्कर पाटोळे वय 38 वर्षे रा.आंबेडकरनगर कोपरगाव याने योगेष संजय शिंदे, शुभम साहेबराव शिंदे, संतोश निवृत्ती शिंदे गणेश वाल्मिक शिंदे,जितेंद्र रणशुर सर्व रा.सुभाषनगर कोपरगांव यांचे विरुद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हटले की फिर्यादी हे त्यांचे परिवारासह घरी असतांना आरोपी 1 ते 4 हे आरोपी जितेंद्र रणशुर याचे सांगणेवरुन फिर्यादी यांचे घरी जावून फिर्यादी तसेच नातेवार्इक यांना मारहाण केली व आरोपी योगेश संजय शिंदे याने त्याचेजवळील लोखंडी चॉपर ने फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे डोक्यात मारुन जखमी केले यासंदर्भात कोपरगांव पोलीस स्टेषनला गु र नं 183/2025 अन्वये वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि किशोर पवार पोसर्इ दिपक रोठे पोसर्इ भ्ाुषण हंडोरे पोसर्इ संजय पवार पुढील तपास करीत आहे.
या घटनेत विजय भास्कर पाटोळे, शुभम साहेबराव शिंदे व योगेश संजय शिंदे हे जखमी झाले आहेत


.jpg)


