समाजात सामंजस्य राहण्यासाठी दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या महत्त्वाच्या दिवशी कोपरगाव शहरात दोन गटात हाणामारी झाली. यातील दोषींना शिक्षा होण्यासाठी कायदेशीर कार्यवाही झालीच पाहिजे. पण अर्धवट माहितीच्या आधारे, द्वेष भावनेतून व सुडापोटी दोन्ही गटातील सामाजिक कार्यकर्त्यांना विनाकारण गोवण्यात आले आहे. समाजात सामंजस्य राहण्यासाठी दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत. असे निवेदन योगशिक्षिका
सौ विमल पुंडे यांनी दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
यापूर्वीही अनेक प्रकरणात कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये अशाप्रकारे काही सामाजिक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
यामुळे कायद्याची नेहमीच पायमल्ली झालेली आहे. विनाकारण निरपराध नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल झाल्यामुळे प्रशासनाच्या विरोधात समाजात रोष निर्माण होतो. हे कायदा सुव्यवस्था बिघडण्यास कारण बनते. याचा सर्वात जास्त त्रास महिला भगिनींना होतो.
जितेंद्र रणशूर व आमचे काही सामाजिक कार्यकर्ते व विविध समाज बांधव मिळून समाजात आपसात सामंजस्य निर्माण व्हावे, कटुता दूर व्हावी यासाठी सतत प्रयत्न करत असतो.
तेंव्हा पोलिसांनी दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यातून शहानिशा करून जितेंद्र रणशूर व इतर निरपराधांची नावे वगळावी व कायद्याची होणारी पायमल्ली थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी विनंती मराठा समाज भगिनींनी कोपरगाव पोलीस स्टेशनला केली आहे.
सदरच्या निवेदनावर योगशिक्षिका सौ . विमल पुंडे, कमल नरोडे आरती गाडे, शिल्पा पुंडे , रोहिणी पुंडे , रूपाली महाडिक, स्वाती हासे , चंद्रकला नरोडे, पुष्पा जगताप, सविता शिंदे, भारती साठे, मंदा कोते, मंगल खोकले, संगीता नरोडे आदी अनेक मराठा भगिनींच्या सह्या आहेत.




