banner ads

गौतम पब्लिक स्कूलच्या वैष्णवी पवारने जिंकली राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धा

kopargaonsamachar
0

 गौतम पब्लिक स्कूलच्या वैष्णवी पवारने जिंकली राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धा


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

 कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलची इयत्ता नववी ची विद्यार्थिनी कु.वैष्णवी ज्ञानेश्वर पवार हिने राज्यस्तरीय शालेय सिलंबम स्पर्धा (१७ वर्ष मुली वयोगट) जिंकून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे अशी माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. स्पर्धेची विजेती वैष्णवी व तिचे पालक विनोद पवार यांचा शाळेचे प्राचार्य नूर शेख व रईसा शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व हाऊस मास्टर्स उपस्थित होते.  राज्यस्तरीय शालेय सिलंबम स्पर्धा २८ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान निमगाव कोऱ्हाळे, शिर्डी येथे पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातून विविध विभागातील १५० स्पर्धक सहभागी झाले होते. कु. वैष्णवी पवार हिने आपल्या कौशल्यपूर्ण व नेत्र दीपक खेळाचे प्रदर्शन करून विजेतेपद पटकावले.

 गौतम पब्लिक स्कूलमध्ये शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉलीबॉल, बेसबॉल आदी खेळांचे व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्या कामी आवश्यक आत्याधुनिक सोयी-सुविधा संस्थेचे मॅनेजमेंट उपलब्ध करून देत असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष मा. आ. अशोकराव काळे, संस्था विश्वस्त आ. आशूतोष काळे, सचिव सौ.चैताली काळे, व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, सर्व संस्था संचालक, प्राचार्य नूर शेख आदींनी कु. वैष्णवी पवार व तिचे प्रशिक्षक इसाक सय्यद व गौरी बारवकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कु.वैष्णवी पवार हीस क्रीडा संचालक सुधाकर निलक, सीलम्बम प्रशिक्षक गौरी बारवकर, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, व्हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, प्रकाश भुजबळ, उत्तम सोनवणे, नसिर पठाण, सोपान गांगुर्डे आदींचे मार्गदर्शन लाभले.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!