banner ads

पोहेगाव, रांजणगाव देशमुख सबस्टेशन कोपरगांव ग्रामीणला लवकरच जोडले जाणार

kopargaonsamachar
0

 पोहेगाव, रांजणगाव देशमुख सबस्टेशन कोपरगांव ग्रामीणला लवकरच जोडले जाणार


" युवानेते विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश "
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, रांजणगाव देशमुख येथील २ सब स्टेशन राहता तालुक्याला जोडलेले आहेत. अनेकदा विजेच्या समस्या निर्माण झाल्यास नागरिकांना वेळेवर प्रश्न सुटत नव्हते. महावितरण कार्यालयाने यावर कार्यवाही करावी यासाठी कोपरगांव तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेकदा कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या.त्यानुसार कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही समस्या मांडली होती.नुकतेच वरिष्ठ स्तरावर आदेश झाले असून लवकरच कोपरगाव ग्रामीणला हे दोन सबस्टेशन जोडले जाणार असल्याने विवेक कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

समस्या निवारण बैठकीतून विवेक कोल्हे यांना वीजेच्या समस्या बद्दल पोहेगाव, रांजणगाव देशमुख आणि चांदेकसारे परिसरातील नागरिकांनी अनेकदा या प्रश्नावर तक्रारी केल्या होत्या. दोनही सब स्टेशन कोपरगाव तालुक्यात जोडले गेले तर समस्या निर्माण झाल्यास त्या सोडवण्यासाठी आम्हाला सोयीस्कर ठरेल अशी या नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली होती.तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल पत्रव्यवहार करून विवेक कोल्हे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली असता मुख्यमंत्री कार्यालयाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले असून लवकरच याबद्दल कार्यवाही सुरू होणार आहे.

अनेकदा वीज प्रवाह खंडित झाला अथवा ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यास नागरिकांना थेट राहता येथे संपर्क करावा लागत होता. या समस्येला सोडवण्यासाठी श्री.  कोल्हे यांनी प्रयत्न केल्याने लवकरच हा प्रश्न निकाली निघणार आहे. विजेच्या वारंवार होणाऱ्या लपंडावामुळे त्रस्त नागरिकांना या निर्णयाने दिलासा मिळणार असून वीस ते पंचवीस गावातील विद्युत क्षेत्रातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!