banner ads

जिरायती गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांच्यामुळे मार्गी

kopargaonsamachar
0

 जिरायती गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांच्यामुळे मार्गी 


बोडखेवाडी पॉईंटपासून चर खोदण्याच्या कामास प्रारंभ
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

कोपरगाव तालुक्याच्या जिरायती भागातील गावात निळवंडे कालव्याचे पाणी पोहोचविण्यात येणाऱ्या अडचणी आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून दूर झाल्या आहेत. निळवंडे कालव्याचे पाणी जिरायती गावात पोहोचविण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या निळवंडे कालव्याच्या बोडखेवाडी पॉइंटपासून चर खोदण्याच्या कामास आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे जिरायती परिसरातील रांजणगाव देशमुख,अंजनापूर,बहादरपूर आदी गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.  

चालू वर्षी उन्हाळा अधिकच तीव्र स्वरूपाचा असल्यामुळे नागरीकांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासू नये यासाठी रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेसाठी स्वत: पदरमोड करणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी शासनाच्या वतीने ज्या काही उपाय योजना कराव्या लागतील त्या उपाय योजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्याचबरोबर नागरीकांच्या देखील पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या देखील पूर्ण करण्यात आ.आशुतोष काळे तत्पर असल्यामुळे शेतकऱ्यांनी चर खोदून देण्याची मागणी करताच त्या मागणीची त्वरित दखल घेवून त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर चर खोदून देण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्या सूचनेनुसार मंगळवार (द.२२) रोजी प्रत्यक्षात निळवंडे कालव्याच्या बोडखेवाडी पॉइंटपासून चर खोदण्याच्या कामास प्रारंभ देखील करण्यात आला आहे. मागील अनेक दशकापासून जिरायती गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांच्यामुळे मार्गी लागला आहे. त्यामुळे रांजणगाव देशमुख-अंजनापूर परिसरातील पाझर तलाव व बंधारे भरुन देण्यासाठी मोठी मदत होवून नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. त्याबद्दल रांजणगाव देशमुख,अंजनापूर,बहादरपूर आदी गावातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले की, आपल्या परिसराच्या अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असून ते माझे कर्तव्य आहे. हे पाणी आपल्यासाठीच आहे त्यामुळे हे पाणी पाझर तलावापर्यंत लवकरात लवकर कसे पोहोचेल व आपल्या अडचणी कायमच्या दूर कशा होतील यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच चर खोदण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना उपस्थित निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. यावेळी रांजणगाव देशमुख, अंजनापूर परिसरातील पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. 

[ बोडखेवाडी पॉईंटपासून चर खोदण्याच्या कामास प्रारंभ  करण्यात आल्यामुळे या चराच्या खोदकामाचा संगमनेर तालुक्यातील भागवतवाडी येथील शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे.त्याबद्दल भागवतवाडी येथील शेतकऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला.]


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!