मढी बु येथे बिरोबा महाराज याञोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोपरगाव तालुक्यातील धार्मिक व आध्यात्मिकतेत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या मढी बुद्रुक येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत श्री बिरोबा महाराज यात्रा उत्सव शुक्रवार दिनांक १८ एप्रिल ते २१ एप्रिल पर्यंत होणार असून या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बिरोबा महाराज यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली .
श्री बिरोबा महाराज यात्रेनिमित्त शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी सकाळी ८. वाजता कावड मिरवणूक ,दुपारी ३ वाजता बारा गाड्या ओढणे, सायंकाळी ६ वाजता काठी मिरवणूक, व रात्री ९ वाजता होईक कार्यक्रम होणार असून रविवार दिनांक १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता लावण्यवती हिंदवी पाटील यांचा आर्केस्ट्रा होणार आहे तर रविवार दिनांक २० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता रील स्टार प्रख्यात नृंत्यांगना सायली पाटील यांचा आर्केस्ट्रा होणार आहे .
तर सोमवार दिनांक २१ एप्रिल रोजी दुपारी दोन ते पाच पर्यंत भव्य घोडा बैल शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी श्री बिरोबा महाराज यांच्या दर्शनाचा व यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मढी बुद्रुक ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.






