- वारीत जय श्रीराम ग्रुपच्यावतीने रामनवमी उत्साहात साजरी

- कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
- तालुक्यातील वारी येथील जय श्रीराम ग्रुपच्या वतीने सालाबाद प्रमाणे रविवारी मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली. यंदाचे हे पाचवे वर्षे होते.
- वारीतील तरुणांनी एकत्र येत पाच वर्षांपूर्वी जय श्रीराम ग्रुपची स्थापना केली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी रामनवमीच्या आदल्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी सामुदायिक हनुमान चालीसा, रामस्तुती पठण तसेच अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांची व्यक्तिरेखा साकारून ती भव्य सजवलेल्या रथात बसविण्यात येते. त्याचबरोबर ट्रॅक्टर मध्येही आकर्षक सजावट करून प्रभू श्रीरामांची प्रतिमा मिरवणूक काढण्यात येते. यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात येते. त्यानंतर संपूर्ण गावात वाजत गाजत ही मिरवणूक काढण्यात येते. मारुती मंदिरापासून सुरुवात केलेल्या मिरवणुकीचे श्री रामेश्वर मंदिर येथे विसर्जन करण्यात येते. यंदाच्या मिरवणुकीत प्रभू श्रीरामचंद्रांची व्यक्तिरेखा निशांत गोरे या तरुणाने साकारली होती. विशेष म्हणजे या मिरवणुकीमध्ये गावातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

- रामनवमी उत्सव यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष विकास बुरुटे उपाध्यक्ष अभिजीत भगुरे, सदस्य सचिन बिरुटे, सुधीर वाकचौरे, शुभम जिरे, अमोल गायकवाड, चेतन भगुरे, स्वप्निल गायकवाड, गणेश थोरात, यश जोशी, संदीप बर्डे, बालू बनभेरू, राहुल टेके, पार्थ मेहेरे यांच्यासह तरुणांनी विशेष परिश्रम घेतले.
- तीन वर्षापासून सामुदायिक हनुमान चालीसा पठण.
- जय श्रीराम ग्रुप च्या माध्यमातून गावातील हनुमान मंदिर येथे प्रत्येक मंगळवारी व शनिवारी सायंकाळी सात वाजता सामुदायिक हनुमान चालीसा पठण घेण्यात येते. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येतो. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात सर्वच वयोगटातील भाविक भक्त सहभागी होतात.
- ----------
वारीत जय श्रीराम ग्रुपच्यावतीने रामनवमी उत्साहात साजरी
एप्रिल ०९, २०२५
0
Tags



