banner ads

कोपरगाव तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, ग्रामीण राजकारण तापणार

kopargaonsamachar
0

 कोपरगाव तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, ग्रामीण राजकारण तापणार



कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

 कोपरगाव तालुक्यातील सन २०२५ ते २०३० दरम्यान सार्वत्रिक निवडणूक द्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता आरक्षण सोडत २३ एप्रिल रोजी काढण्यात आली.कोपरगाव  तहसीलच्या सभागृहात तहसीलदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली  निवडणूक नायब तहसीलदार  चंद्रशेखर कुलथे,प्रफुल्लिता सातपुते,सौ.बानगर यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढून ग्राम पंचायत निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.

 गाव पातळीवरील ग्रामपंचायत सरपंच पद हे अतिशय महत्त्वाचे असल्याने या आरक्षण सोडतीकडे कोपरगाव  तालुक्यातील गाव पातळीवरील राजकारण्यांचे लक्ष लागले होते 
कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सन-२०२५-२०३० या कालावधीसाठी आरक्षण तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचे उपस्थितीत आज जाहीर करण्यात आले आहे.

यात ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी एकूण जागा पैकी ५० टक्के  जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.इतर मागासवर्गीय घटकामध्ये मोडणाऱ्यांसाठी लोकांकरीता २७ टक्के जागा आरक्षित आहेत यात अनुसूचित जातीसाठी १० ग्रामपंचायती जाहीर झाल्या आहेत त्यात कोळगाव-थडी,धोत्रे,सोनेवाडी,पढेगाव,मुर्शतपुर,अंचलगाव,तळेगाव-मळे,कोळपेवाडी,आपेगाव,घारी आदी दहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे.त्यामुळे कोठे समाधान तर कोठे नाराजी असे चित्र पाहायला मिळाले आहे. 

अनुसूचित जमातीसाठी १६ ग्रामपंचायती जाहीर करण्यात आलेल्या आहे  ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहे.त्यात मनेगाव,खिर्डी-गणेश,काकडी-मल्हारवाडी,भोजडे,मढी बुद्रुक,सुरेगाव,खोपडी,नाटेगाव,शिंगणापूर,वारी,बहादराबाद,बहादरपूर,खोपडी,रांजणगाव-देशमुख,जवळके,शहापूर आदींचा समावेश आहे.तर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी तालुक्यातील २० ग्रामपंचायतींचा समावेश झाला असून त्यात माहेगाव-देशमुख,कारवाडी,ओगदी,बोलकी,येसगाव, कोकामठाण,तिळवणी,कान्हेगाव,डाउच बुद्रुक,जेऊर कुंभारी,देर्डे-कोऱ्हाळे,मढी खुर्द,पोहेगाव,गोधेगाव,उक्कडगाव,दहेगाव बोलका,सोनारी,धारणगाव,चासनली,वडगाव आदींचा समावेश झाला आहे. सर्वसाधारण सरपंच पदाच्या २९ जागांसाठी ग्रामपंचायती निश्चित असून त्यात मोर्विस,धामोरी,मायगाव देवी,सांगवी भूसार,मळेगाव थडी,रवंदे,कुंभारी,मंजूर,बक्तरपुर,हंडेवाडी,शहापूर,हिंगणी,ब्राम्हणगाव,करंजी बुद्रुक,टाकळी,चांदगव्हाण,जेऊर-पाटोदा,संवत्सर, कासली ,शिरसगाव,लौकी, सडे,देर्डे-चांदवड, डाऊच खुर्द,चांदेकसारे,अंजनापुर,धोंडेवाडी,वेळापूर,वेस-सोयगाव आदींचा समावेश झाला आहे

यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणासाठी  ०८ ग्रामपंचायती होत्या त्यातील ०६ ग्रामपंचायतीची सोडत पद्धतीने (चिठ्ठी ) लहान मुलीच्या कु.नियारा क्षीरसागर या मुलीच्या हाताने निघालेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहे.सोनारी,वेळापूर,चासनळी,उक्कडगाव,दहिगाव,धारणगाव,चासनळी,वडगाव आदींचा समावेश आहे.
आरक्षण सोडतीमुळे सरपंचपदासाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना आतापासून तयारी करण्यासाठी वेळ मिळणार आहे. काही ठिकाणी अपेक्षित आरक्षण निघाले नसल्याने अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला आहे. मात्र इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!