banner ads

डाकसेवेतुन जनसेवेला प्राधान्य द्या-उमेश जनवाडे

kopargaonsamachar
0

 डाकसेवेतुन जनसेवेला प्राधान्य द्या-उमेश जनवाडे


कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

            आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे, डाकसेवेतुन जनसेवेला प्राधान्य द्या, पोष्ट खात्याच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवुन जनमानसात पोस्ट सेवेचा ठसा उमटवावा असे आवाहन श्रीरामपुर डाक अधिक्षक  उमेश जनवाडे यांनी केले.

           २०२३.२४ व २०२४.२५ या आर्थीक वर्षात श्रीरामपुर पोष्ट विभागाअंतर्गत कोपरगांव कार्यक्षेत्रात उपविभागीय उत्कृष्टता पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी साजरा करण्यांत आला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

          प्रारंभी कोपरगांवचे उपविभागीय डाक निरीक्षक आनंद सोनवणे व पोष्टमास्तर राजेश नेतनकर यांनी प्रास्तविकात आर्थीक व्यवसायाचा आढावा देवुन भारतीय पोष्ट अंतर्गत सेवा त्यात ग्रामिण भागात काम करतांना येणा-या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली. इंडिया पोष्ट बँक श्रीरामपुरचे शाखा प्रबंधक स्वप्नील सावंत यांनी जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोष्ट सेवा देण्यासाठी येथील प्रत्येक कर्मचा-याने सतर्क रहावे त्यातुन व्यवसायाची वृध्दी वाढवावी, येणा-या प्रत्येक आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करून पुढे जावे व श्रीरामपुर विभागाचे नांव उज्वल करावे असे ते म्हणाले.

            उमेश जनवाडे पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य शासन अंतर्गत विविध लाभाच्या योजना व त्यातुन निर्माण होणारी आर्थीक उलाढाल ग्रामिण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यांचे प्रामाणिक काम भारतीय पोष्ट विभागाने केले असुन तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाने प्रगत व्हावे, जनमाणसात पोष्टाच्या विश्वासार्हतेवर अनेकांनी शिक्कामोर्तब केला आहे. कोरोना आपत्तीतही आपण जीवाची बाजी लावुन काम केले आहे. येणारा काळ स्पर्धेचा आणि खडतर आहे तेंव्हा पोष्ट खात्यामार्फत वेळोवेळी दिली जाणांरी उददीष्टये प्रत्येकांने साध्य करण्यासाठी मनांपासुन काम करावे आणि जनमानसात पोस्ट सेवेचा ठसा उमटवावा.

              याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक  कोल्हे यांच्या वतीने सचिव तुळशीराम कानवडे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, रंगनाथ लोंढे यांनी डाक अधीक्षक उमेश जनवाडे यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार केला, तर सर्वश्री सुनिल दत्तात्रय आंबेकर (लोणी), संजय विष्णु जाधव (कोपरगांव), अरविंद मनोहर विश्वास (चिंचोली गुरव), दिलीप भाउसाहेब आंधळे (कोकणगांव), रविंद्र दगुराव निंबाळकर. ( रवंदे), प्रतिभा सुनिल महामिने (तळेगांव), प्रशांत बबनराव बांडे (आश्वी), दत्तात्रय अशोक घोडके. ( धोत्रे), राजेश वा. नेतनकर (कोपरगांव), विजय लक्ष्मण जोर्वेकर (चासनळी), प्रशांत चंद्रभान जाधव (तळेगांव), श्रीमती अंजुमन बाबुरवंदे), प्रशांत बबनराव बांडे (आश्वी), दत्तात्रय अशोक घोडके (धोत्रे), राजेश वा. नेतनकर (कोपरगांव), विजय लक्ष्मण जोर्वेकर (चासनळी), प्रशांत चंद्रभान जाधव (तळेगांव), श्रीमती अंजुमन शेख (लोहगांव), अशोक जगन्नाथ वाघमारे ( कोळपेवाडी), विजय गोरक्षनाथ बाभुळके (कोपरगांव), रामदास आडभाई, सारिका संतोष दहिफळे (गोधेगांव), राजेंद्र विश्वनाथ वरपे (लोणी), दत्तात्रय साहेबराव डुबे (देर्डे को-हाळे), कचेश्वर बाबुराव गव्हाणे (सोनेवाडी), अशोक चंद्रभान रहाणे (मढी), मुक्ता तुकाराम खोले (चिंचोली गुरव), संजय कचरू वाघमारे (प्रोटोकॉल ड्युटी सावळीविहीर बुदुक), कैलास कचरू कोळगे (सावळीविहीर बुद्रुक), पल्लवी मोहन गुंड (एकरूखे), दत्तात्रय ज्ञानदेव गायकवाड (संवत्सर), किशोर निवृत्ती दिघे (दहेगांव), नंदकिशोर पोपट लांडगे (सांगवीभुसार), अनंत भाउसाहेब गडाख (धामोरी) यांच्यासह डाकविभागातील विविध गुणवंत कर्मचा-यांना सवोत्कृष्ट पुरस्कारासह प्रमाणपत्राचे वितरण डाक अधीक्षक उमेश जनवाडे (श्रीरामपूर) यांच्या हस्ते करण्यांत आले. सुत्रसंचलन नंदकिशोर लांडगे तर लोणीच्या पल्लवी डोखे यांनी केले, शेवटी पोपट सुळ यांनी आभार मानले. कार्यकम यशस्वी करण्यांसाठी सर्वश्री अर्जुन मोरे, संजय ढेपले, बापु चव्हाण, अक्रम शेख, आकाश आढाव, गौरव वाघ आदिंनी विशेष परिश्रम घेतले. मुर्शतपुर पोष्टाचे विजय गुंजाळ यांची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याबददल त्यांचाही सत्कार करण्यांत आला.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!