banner ads

चासनळी च्या मायभुमीला म.फुले जीवनकार्य गौरव पुरस्कार

kopargaonsamachar
0

 चासनळी च्या मायभुमीला म.फुले जीवनकार्य गौरव पुरस्कार 

 आ.सत्यजित तांबे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 तालुक्यातील चास ( नळी)  येथील मायभुमी सोशल फाउंडेशनला महात्मा फुले जयंती उत्सव समिती,एच.ए.एल.ओझरचा जीवनकार्य गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.  अकरा एप्रिल रोजी म.फुले जयंतीला किनो थिएटर, ओझर टाऊनशीप येथे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.रोख रक्कम, सन्मानपत्र,शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या प्रसंगी आ.सत्यजित तांबे व आयोजक नितीन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या कामाचे कौतुक करत गौरवोद्गार काढले.
         मायभुमी सोशल फाउंडेशन हे दर रविवारी ग्रामस्वच्छता,स्मशानस्वच्छता व      नदिस्वच्छता,वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन, शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप व सामाजिक सलोखा टिकून ठेवण्याचे काम अविरतपणे करत आहे. स्मशानाबाबतच्या अंधश्रद्धा दुर करण्यात ते प्रयत्नशील आहेत.मृत्युनंतर अंत्यसंस्कारासाठी मदत करतांनी काही कुप्रथा रोखण्यात त्यांना यश आले आहे.विद्यार्थी व गरजुंना मदत करण्यात ते अग्रेसर असतात.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यावेळी सचिन चांदगुडे, संतोष पऱ्हे, कैलास माळी, विजय चव्हाणके, देविदास कासोदे, बबन गाडे,वेदांत चांदगुडे,बाळासाहेब सैंदाणे, शांताराम बिरुटे आदि कार्यकर्ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी  उपस्थित होते.या पुरस्कारामुळे  सामाजिक काम अधिक जोमाने करण्याची प्रेरणा मिळाली, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
चास (नळी)गावासाठी हा पुरस्कार हा भुषणावह बाब असल्याने गावकऱ्यांनी मायभुमी सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!