चासनळी येथे रक्तदान करुन प्रेरणा दिन साजरा
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त चासनळी येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. स्व. कोल्हे यांच्या प्रतिमेला अभिवादन करत रक्तदान शिबिराचा प्रारंभ करण्यात आला .
२४ मार्च हा प्रेरणा दिन म्हणून सबंध कोपरगाव आणि परिसरात साजरा होत असताना आरोग्य सेवा ही सर्वोत्तम मानणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे होणारे आयोजन हे अभिमानास्पद आहे.
रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा दिवसेंदिवस निर्माण होत आहे.जनसामान्यांच्या जीवनात आनंद देणारे स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांच्या जयंतीची प्रेरणा घेत अनेकांनी रक्तदान केले. गरजू रुग्णांना अशा रक्तदान शिबिरातून रक्तपुरवठा झाल्याने जीवनदान मिळत असते. कोल्हे यांच्या स्मरणार्थ मोफत फिरता दवाखाना गावोगावी अनेकांना सेवा देत आहे.








