येसगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान
जागतिक महिला दिना निमित्ताने येसगांव ग्रामपंचायतच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान आणि सत्कार संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मॕनेजिंग ट्रस्टी सौ.रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते आकर्षक भेटवस्तु देऊन करण्यात आला.
उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मॕनेजिंग ट्रस्टी
रेणुका कोल्हे यांनी क्रांतिकारक महिलांचा आदर्श आणि कार्यकर्तृत्व सांगत आज महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, प्रत्येक महिलेने आत्मविश्वास धडाडीने आणि प्रामाणिकपणे काम केले तर प्रत्येक क्षेत्रात महिला यशस्वी होऊ शकतात
८ मार्च हा दिवस केवळ महिलांचा गौरव करण्यासाठीच नाही, तर त्यांच्या संघर्ष, त्यांचे योगदान, आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे .महिला या समाजाच्या आधारस्तंभ असुन त्यांचे कार्य आणि योगदान समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात महत्वपूर्ण असल्याचे सौ.कोल्हे म्हणाल्या.
यावेळी पंचायत समिती कोपरगांवचे विस्तार अधिकारी प्रशांत वाघमारे, सरपंच पुंडलिक गांगुर्डे, उपसरपंच संदीप गायकवाड, सोसायटीचे चेअरमन तथा ग्रामपंचायत सदस्य. सचिन कोल्हे, अतुल सुराळकर, किरण गायकवाड, उत्तम पाईक, बंडू आदमने , सौ.आयोध्या अमोल झावरे, सौ रुपाली आदमने, मीना काळे सौ रंजना गायकवाड, रवींद्र कळसकर , सतीश गोसावी , प्रसाद सुराळकर , कपिल सुराळकर,ग्रामपंचायतचे रमेश वाघ, ग्रामअधिकारी सिध्दार्थ काळे ,सह
अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, शिक्षिका, आरोग्यसेविका, बचतगटांच्या महिला मोठ्या
संख्येने उपस्थित होत्या.यावेळी मान्यवरांच्या हस्ते आशा सेविकांना कपाटाचे वाटप व
घरकुल लाभार्थी यांचे घरकुलांचे भूमी पूजनासह गृहप्रवेश करण्यात आले.






