banner ads

जगात सध्या सज्जनाऐवजी दुर्जनांचे संघटन- साध्वी अनुराधा दिदी

kopargaonsamachar
0

 जगात सध्या सज्जनाऐवजी दुर्जनांचे संघटन- साध्वी अनुराधा दिदी 

मठाधिपती परमपूज्य रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कथेची सुरुवात
 कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

               जगात सध्या सज्जनाऐवजी दुर्जनांचे संघटन लवकर होत आहे, सज्जनांच्या संघटनासाठी साधु-संत-महंत सातत्याने प्रयत्न  करत आहेत, जीवनांतील व्यथा दूर करण्यासाठी धार्मिक कथा महत्वाच्या आहे, प्रत्येकाला आपल्या जीवनाचे भविष्य जाणून घेण्याची ओढ लागली आहे, भविष्यापेक्षा अध्यात्म नामस्मरणातून पुण्याईचा साठा प्रत्येकाने वाढवावा तोच आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेणारा आहे असे प्रतिपादन साध्वी अनुराधा दीदी पंढरपूरकर यांनी केले.

             येथील मुंबादेवी तरुण मंडळाचे वतीने दरवर्षी रामनवमीनिमित्त साईगांव पालखी सोहळ्‌याचे आयोजन केले जाते. यंदाचे हे ३१ वे वर्ष आहे. त्यानिमित्त संत ज्ञानेश्वरनगरी तहसिल कार्यालय मैदान कोपरगांव येथे गुढीपाडव्याचे मुहूर्ता पासून ५ एप्रिल पर्यंत श्री शिवमहापुराण कथा आयोजित करण्यांत आली असून त्याचे पहिले पुष्प गुंफतांना साध्वी अनुराधादिदी पंढरपुरकर बोलत होत्या. प्रारंभि राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कथेची सुरुवात करण्यात आली, विश्वात्मक जंगली महाराजांच्या हस्ते आरती करण्यात आली. कार्यक्रमस्थळी भगवान शंकराच्या पांढऱ्या शुभ्र मूर्तीचा देखावा तयार करण्यात आला असून , प्रवेशद्वाराला वैकुंठवासी हभप गणपतमहाराज लोहाटे महाराज नाव देण्यांत आहे. पहाटपाडवा होऊन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे व सौ रेणुका कोल्हे या उभयताच्या हस्ते पूजन करून नयन मनोहर गुढी उभारण्यांत आली होती, शहरातून महिला व मुलींची भव्य बाईक रॅली काढली होती. सहभागी भक्तांना मान्यवरांच्या हस्ते जळगांवकर सराफ यांच्यावतीने सोन्याची नथ, ब्रेसलेट, तसेच पैठणी बक्षिसे वाटण्यांत आली.

             साध्वी अनुराधा दीदी पंढरपुरकर पुढे म्हणाल्या की, जग हे भितीने भरलेले आहे ब्रम्ह, पद‌म, विष्णु, शिव, भागवत, नारद, मार्कंडेय, अग्नी, भविष्य, ब्रम्हवैवर्त, लिंग, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड, आणि ब्रम्हांड ह्या अठरा पुराणांत शिवमहापुराण चौथ्या क्रमांकावर आहे. स्कंद पुराणांत त्याचे 81हजार श्लोकांचे विवेचन केले आहे. काळ, कर्म, धर्म, मोह हे पाश आहे. पाशमुक्त सदाशिव आहे. भोगाला रोगाचे, उच्च कुळाला पतनाचे, मानीला अपमानाचे, सौद‌र्याला म्हातारपणाचे, शास्त्र जाणणाऱ्याला वादाचे, विनम्राला दृष्टाचे, देहाला यमाचे भय लागलेले आहे, या भयातून फक्त भगवान शंकराची सेवा भक्ती- नाम सोडवू शकते, शंकर म्हणजे विश्वास आणि भवानी म्हणजे श्रध्दा, परमार्थात या दोन नेत्राला विशेष महत्व आहे जे कक्षा प्रवण करतात त्यांनी त्या काळात ब्रम्हचर्यत्व पाळावे गादीवर झोपू नये, बाजारी अन्नाचा त्याग करावा, परअन्न वज्य करावे, अभक्ष्याचा त्याग करावा, घरात कलह करू नये, दुसऱ्याची निंदा करू नये, पुण्य केलेले कुणाला सांगू नये, पापाचा त्याग करावा पण हल्ली नेमकं उलट घडत आहे, मनातील विकार काढण्यासाठी भक्ती, नामस्मरण महत्वाचे आहे. दुःखात अनेकांना देव आठवतो,. सुखात अनेकांचे त्याकडे दुर्लक्ष होते. संतांच्या शब्दांचा कधीही अनादर करू नये. परमार्थात येण्यासाठी खरं लागतं पण हल्ली जगात खोट्याचा बोलबाला आहे. गुजराथ जुनागडचे नरसी मेहता हे भगवान शंकराचे सर्वात आवडते भक्त होते; वृंदावन रासक्रिडेत त्यांनी मशाल धरण्याची सेवा केली; असे त्या म्हणाल्या. मुंबादेवी तरुण मंडळाचे सर्व साई सेवक सूत्रबद्ध नियोजन करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!