banner ads

वेळेचा भांडवल म्हणुन वापर करा --डॉ. दिपक शिकारपुर

kopargaonsamachar
0

 वेळेचा भांडवल म्हणुन वापर करा --डॉ. दिपक शिकारपुर

संजीवनी  मध्ये राष्ट्रीय  तांत्रिक स्पर्धांचे उद्घाटन
११०० स्पर्धकांचा सहभाग

कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

 अलिकडच्या काही वर्षांमध्ये  तंत्रज्ञानात झपाट्याने  बदल होत आहे. यात आर्टीफिशियल इंटिलिजन्स (एआय) म्हणजेच कृत्रिम बुध्दीमत्तेची महत्वपुर्ण भुमिका आहे. एआयच्या मदतीने शैक्षणिक , औद्योगीक, कृषी , सामजिक, अशा  अनेक क्षेत्रात भविष्यात  क्रांती घडवुन आणन्याची क्षमता निर्माण झालेली आहे. शिक्षण ही  सतत चालु राहणारी प्रक्रिया आहे, त्यासाठी वेळेचा भांडवल म्हणुन वापर करा व स्वतःला अद्ययावत ठेवा तरच आपण जीवनात यशस्वी होवु, असे प्रतिपादन जागतिक दर्जाचे आयटी इंजिनिअर, डिजिटल साक्षरता कार्यकर्ते व लेखक आणि करिअर सल्लागार डॉ. दिपक शिकारपुर यांनी केले.

संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निक आयोजीत, संजीवनी युनिव्हर्सिटी व रोटरी क्लब ऑफ कोपरागांव सेंट्रल प्रायोजीत राष्ट्रीय  तांत्रिक स्पर्धा ‘संजीवनी टेक मंत्रा २९२५’ च्या उद्घाटन प्रसंगी डॉ. शिकारपुर प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. याप्रसंगी मंचावर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, लघु उद्योग भारती, नाशिकचे अध्यक्ष, उद्योजक व संजीवनीचे माजी विद्यार्थी  निखिल तापडीया, रोटरी क्लब ऑफ कोपरगांव सेंट्रलचे अध्यक्ष  राकेश  काले, संजीवनी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकुर, इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. एम. व्ही नागरहल्ली, पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रा. ए. आर. मिरीकर, संजीवनीचे माजी विद्यार्थी व उद्योजक  कमलेश उशीर  आणि सर्व विभाग प्रमुख व डीन्स व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी प्राचार्य मिरीकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून संस्थेच्या प्रगतीचा चढत्या कमानीचा आलेख मांडला तसेच एकुण स्पर्धेविषयी माहिती देवुन ११०० स्पर्धकांनी भाग घेतल्याचे सांगीतले. डॉ. ठाकुर यांनी संजीवनी विद्यापीठाची माहिती दिली.
   डॉ. शिकारपुर पुढे म्हणाले की विद्यार्थ्यानी उद्योगांना अपेक्षित कौशल्ये आत्मसात करण्यासाठी इंटरनेटचा सकारात्मक वापर करणे गरजेचे आहे. तसेच सॉफ्ट स्किल्स अवगत करणेकरीता विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा उपयोग करणे महत्वाचे ठरेल. परदेशात  बहुराष्ट्रीय  कंपन्यांमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असुन त्याकरीता परदेशा भाषा  शिकणे आवश्यक  आहे.

दुसरे सन्माननिय अतिथी श्री तापडीया म्हणाले की तांत्रिक शिक्षण  घेणारे विद्यार्थी भारताच्या सर्वांगीण  विकासाचा कणा आहे. विद्यार्थ्यांनी तांत्रिक प्रोजेक्टकडे बघण्याचा दृष्टिकोन  उद्योजक बनण्यासाठीचा ठेवुन इतरांना रोजगार देण्याकरीता स्वतःचा व्यवसाय चालु करावा, असे आवाहन केले.
अध्यक्षिय भाषणात   अमित कोल्हे म्हणाले की बदलत्या काळाची गरज लक्षात घेता संजीवनी युनिर्व्हसिटीमध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगवर भर देण्यात आला आहे. आपणही त्या पध्दतीने पुढे गेल्यास अधिक तंत्रज्ञान अवगत होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन २०४७ साली भारत विकसीत भारत असेल. त्यासाठी तुम्ही खरे आधार आहेत. मोठी स्वप्ने पहा. शिकत असताना शिकण्याकडेच लक्ष द्या, पुढील ४०वर्षे  सुखाचे जातील.
टेक मंत्राचे समन्वयक प्रा. एस. ए. पाटील यांनी आभार मानले.या स्पर्धा आयोजीत करण्याकरीता आयएसटीई व इन्स्टिट्यूशन  ऑफ इंजिनिअर्सचे सहकार्य लाभले. तसेच सर्व विभाग प्रमुख, डीन्स आणि टेकमंत्राचे सहसमन्वयक डॉ. एस.पी. तनपुरे व प्रा. व्ही. एस.धांडे यानी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष  परीश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!