banner ads

क्रीडा स्पर्धांमधुन खेळाडूंना व्यक्तिमत्व विकसीत होण्यास मदत - सुमित कोल्हे

kopargaonsamachar
0
क्रीडा स्पर्धांमधुन खेळाडूंना व्यक्तिमत्व विकसीत होण्यास मदत 
 -  सुमित कोल्हे
                          संजीवनीफाऊंडेशन   आयोजीत      भव्य    बॅडमिंटन    स्पर्धा    संपन्न 
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 शालेय  अथवा महाविद्यालयीन जीवन संपल्यांवर खेळाडूंना त्यांच्या क्षमता शोधण्यासाठी व कौशल्ये दाखविण्यासाठी थोड्या  कमी संधी मिळतात. मात्र खुल्या स्पर्धा घेतल्यास सर्व खेळाडूंना संधी मिळतात. खेळाडूंनी  दीर्घकाल आपल्या आवडत्या खेळाचा ध्यास घेतल्यास त्यांचे  शारीरिक माणसिक आरोग्य सुधारते, सर्वांगीण वाढीसाठी आणि विकासासाठीही मदत होते, त्यांच्यात  क्षमता व अनुभव वाढीस लागुन त्यांच्यात विश्वास  प्राप्त होतो, व्यक्तिमत्व विकसीत होण्यास मदत होते, अशा  अनेक बाबींचा फायदा होतो, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त  व संजीवनी फाऊंडेशनचे सचिव  सुमित कोल्हे यांनी केले.

संजीवनी फाऊंडेशन आयोजीत मेन्स डबल व वय ३५ वर्षे  वरील  खेळाडूंच्या डबल भव्य बॅडमिंटन स्पर्धा संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या जीमखाना हॉल मध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी श्री कोल्हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  रवी आढाव , कुणाल आभाळे उपस्थित होते. सदर स्पर्धांसाठी विविध ठिकाणाहुन एकुण ३८ संघ आले होते. दरवर्षी  संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात येतात, यावर्षी  बॅडमिंटनच स्पर्धा घेण्यात आल्या.
 सुमित कोल्हे पुढे म्हणाले की स्व.शंकरराव व कोल्हे यांचा दृष्टिकोन असायचा की खेळाडूंना कोणतीही सुविधा अपुरी न पडता त्यांच्यातील क्रीडा गुणांचा विकास झाला पाहीजे. यानुसार संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  संजीवनी अंतर्गतच नव्हे तर बाहेरच्या खेळाडूंनाही योग्य ते पाठबळ देण्यात येते.
मेन्स डबल मध्ये वसिम शेख व तेजस खुमणे यांच्या जोडीने रू २१,००० चे प्रथम बक्षिस जिंकले. अक्षय किसरवार व विवेेक चंद्रवर्षी  यांच्या जोडीने रू ११,००० चे दुसरे बक्षिस जिंकले तर अक्षय ससे च हर्षल  जाणेराव यांच्या जोडीने रू ७,००० चे तिसरे बक्षिस जिंकले. या तीनही जोड्या पुण्याच्या आहेत. ३५ वर्षे  वरील डबल्स वयोगटात शेखर दायमा व समिरण मंडळ या राहुरीच्या जोडीने रू ७००० चे पहिले बक्षिस जिंकले.मनोज व्यास व समाधान डोंगरे या जालन्याचे जोडीने रू ५००० चे दुसरे बक्षिस जिंकले तर मोहनराव गोंगाडा व विजय पवार या अहिल्यानगरच्या जोडीने रू ३००० चे तिसरे बक्षिस जिंकले. या सर्व विजयी खेळाडूंना  सुमित कोल्हे व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!