banner ads

आता एका फोन कॉल द्वारे मिळणार घरपोहच दाखले व उतारे

kopargaonsamachar
0

 आता एका फोन कॉल द्वारे मिळणार घरपोहच दाखले  व उतारे 


शहाजापूर ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम 

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी त्या योजनांचा सर्वसामान्यांना सुलभतेने लाभ मिळावा या उद्देशाने प्रत्येक विभागाने शंभर टक्के ,शंभर दिवसात करावयाच्या कामांचा  कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले होते.   त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव तालुक्यातील  शहाजापूर ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांसाठी एका फोन कॉल द्वारे घरपोहच त्यांना हवे असणारे दाखले व उतारे मिळणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी महेश काळे यांनी सांगितले .


याकरिता नागरिकांना त्यांचा चालू वर्षातील प्रॉपर्टी टॅक्स भरणे आवश्यक असून त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या फोन नंबर वर भरल्याची पावती पाठवल्यास व आवश्यक ते शुल्क ऑनलाईन भरल्यास त्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामार्फत घर पोहोच हवा असलेला दाखला उतारा मिळणार आहे .ग्रामपंचायतच्या या निर्णयाची अंमलबजावणी आठ मार्च महिला दिनापासून करण्यात येणार असल्याचे सरपंच मनीषा माळी यांनी सांगितले असून ग्रामपंचायतच्या या निर्णयाचे जेष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती तसेच महिलांकडून  स्वागत करण्यात येत आहे. 

ग्रामपंचायतीने याही पूर्वी अशाच नवनवीन योजना राबविल्या असून त्यामध्ये पाणीपट्टी, घरपट्टी भरण्यासाठी शंभर टक्के क्यू आर कोड चा वापर करण्यात येत असून मागील आर्थिक वर्षापासून  अधिक वसुली ही ऑनलाइन केली जात आहे त्यामुळे ग्रामपंचायतीचा वेळ वाचला असून नागरिकांनाही कर डायरेक्ट ग्रामपंचायत च्या खात्यात जमा झाल्याचा आनंद तसेच ग्रामपंचायतच्या व्यवहारात पारदर्शकता तसेच विश्वासार्हता वाढली आहे ग्रामपंचायतने गावठाणात सर्व रस्ते दुतर्फा उंच नारळ वृक्षांची लागवड केली असून गाव हिरवे करण्यात आलेले आहे .तसेच ग्रामपंचायतीने स्वतःचा ट्रॅक्टर खरेदी करून त्याद्वारे गावातील सर्व कचरा हा गोळा केला जात आहे त्याद्वारे गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा ठेवण्याचा गावचा मानस असून यासाठी गावचे उपसरपंच शरद वाबळे सर्व सदस्य व कर्मचाऱ्यांचे सहकार्य   लाभत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!