banner ads

स्वामी भगवतानंदगिरी महाराज यांची सेक्रेटरी पदी निवड.

kopargaonsamachar
0

 स्वामी भगवतानंदगिरी महाराज यांची सेक्रेटरी पदी निवड.



कोपरगाव ( लक्ष्मण वावरे ) 

              तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील स्वामी भगवतानंदगिरीजी महाराज यांची शंभु पंचदशनाम जुना आखाडा गिरनार (जुनागड गुजराथ) तसचे त्र्यंबकेश्वर येथील निलपर्वतच्या सेक्रेटरीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे ब्रह्मलीन संत रामदासी महाराज भक्त कोकमठाणच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.


   श्रीक्षेत्र काशी जुना पंचदशनाम आखाड्याचे पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष सभापती स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज व आंतरराष्ट्रीय महामंत्री स्वामी प्रेमगिरीजी महाराज व हरीगिरीजी महाराज यांनी स्वामी भगवतानंदगिरी महाराज यांच्या नियुक्तीची १४ मार्च रोजी श्रीक्षेत्र काशी येथे घोषणा केली आहे.
           स्वामी भगवतानंदगिरी महाराज यांनी प्रयागराज येथे झालेल्या महा कुंभमेळ्यात हजेरी लावून सहभाग नोंदवला. ब्रह्मलीन संत रामदासी महाराज यांच्या कार्य प्रेरणेत ते सतत सहभागी होतात. १९८१ मध्ये त्यांनी घर सोडून  संपूर्ण भारत भ्रमण करत पायी तीर्थयात्रा केल्या. ४४ वर्षात त्यांनी अध्यात्माची सेवा केली. भवनाथ मंदिर गिरणार चा जिर्णोद्धार करून १९ वर्षे सेवा दिली.   सध्या भीड 
भंजन महादेव मंदिर गिरनार, नील पर्वत त्रंबकेश्वर, जुना आखाडा त्र्यंबकेश्वर, श्रीक्षेत्र कोकमठाण येथे ते सेवा देत आहेत.

 त्यांच्या निवडीबद्दल खासदार भाऊसाहेब वाकचौरे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष काळे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, रामदासी बाबा भक्त मंडळाचे शरद थोरात, कोकमठाण पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अभिनंदन करून त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!