banner ads

वायरमनला मारहाण व शिविगाळ

kopargaonsamachar
0

 वायरमनला मारहाण व शिविगाळ      शासकीय कामात अडथळा ! एका विरुध्द गुन्हा दाखल


संवत्सर येथिल घटना

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

तालुक्यातील संवत्सर येथे सेवा बजवणा-या वायरमनला मारहाण व शिवीगाळ केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आज एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की विजवितरण कंपनी कोपरगाव अंतर्गत संवत्सर कक्ष येथिल विद्युत सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले
दिनेश विक्रम सुरवसे यांनी  कोपरगाव शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की मी म.रा.वि. वि. कंपनी मर्यादित कोपरगाव अंतर्गत संवत्सर कक्ष   येथे  विद्युत सहाय्यक म्हणून काम करतो मी आज दिनांक १५ मार्च  २०२५ रोजी सकाळी नऊ वाजे सुमारास मी व सोबत मयूर प्रभाकर गोरे असे दोघे संवत्सर गावातील लक्ष्मी नगर परिसरात वीज बिल वसुलीसाठी गेलो होतो त्यावेळी  लघुवाहिनीवर अनधिकृतपणे आकडा  टाकलेला दिसला तेव्हा मी सदर आकड्या बाबत विचारपूस केली असता सदर आकडा गणपत रामदास गायकवाड राहणार लक्ष्मी नगर ता कोपरगाव याचे असल्याचा समजला तेव्हा आम्ही सदर इसमाच्या  घरी जाऊन त्यास विचारपूस केली व त्यास सदर अनाधिकृत पणे टाकलेला आकडा काठ असे  सांगितले


 असता तो आम्हास म्हणाला की तुम्हाला काय करायचे ते करा मी आकडा काढणार नाही तेव्हा आम्ही त्यास समजावून सांगत असताना त्याचा त्यास राग येऊन त्याने आमचे सरकारी कामात अडथळा करून मला बळजबरीने धक्काबुक्की करून घाण घाण शिवीगाळ केली व पुन्हा येथे आला तर तुझे हात पाय तोडून टाकीन व जीवे ठार मारून टाकीन अशी मला धमकी दिली तेव्हा सदर प्रकार पाहून माझे सोबतचे सहकारी  मयूर प्रभाकर गोरे हे तेथे आले व ते मला त्याचे तावडीतून सोडत असताना गणपत गायकवाड यांनी त्यांची देखील गच्ची पकडून धक्काबुक्की करून शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा आम्ही दोघे तिथून निघून आलो व सदर प्रकार आमचे वरिष्ठ  प्रशांत बाबासाहेब बोंडखळ, हर्षद बाळकृष्ण बावा यांना सांगितल्या नंतर वायरमन दिनेश सुरवसे यांनी पोलिस स्टेशन गाठत    गणपत रामदास गायकवाड  याचे विरुध्द शासकीय कामात अडथळा निर्माण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दिली आहे. कोपरगाव  शहर पोलिसांनी  कलम १३२,११५(२),३५२,३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पो.काॕ.जालिंदर तमनर हे करीत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!