मा.मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांची जयंती झाली प्रेरणादिन
' कोपरगांव मतदारसंघासह परिसर झाला प्रेरणामय '
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
मा. मंत्री स्व .शंकरराव कोल्हे यांची जयंती प्रेरणा दिवस म्हणून कोपरगाव मतदार संघात व्यापक प्रमाणात साजरी करण्यात आली. स्वर्गीय कोल्हे यांचा जन्मदिवस हा विविध क्षेत्रातील नागरिकांनी प्रेरणा म्हणून साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. अभ्यासू, कर्तबगार आणि उत्तुंग कार्य असणाऱ्या स्व. कोल्हे साहेब यांचे जीवन चरित्र प्रत्येकाला आपापल्या जीवनात प्रेरणा देण्यासाठी मोलाचे आहे ही भावना ठेवून कोपरगाव मतदारसंघातील व परिसरातील विविध गावांमध्ये मोठ्या उत्साहात हा प्रेरणा दिवस साजरा झाला.
स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप, अमरधाम मध्ये बैठक बाकडे, रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना कॅप वाटप, स्कूल बॅग वाटप, दिव्यांगांना किराणा किट, धोत्रे ग्रामपंचायतचे घंटागाडी लोकार्पण, सोलर हाय मॅक्स, इन्वर्टर, घड्याळ सिलिंग फॅन,सतरंज्या, विविध मंदिरांची साफसफाई, शालेय विद्यार्थ्यांना पाणी बॉटल वाटप, चित्रकला स्पर्धा, वेस सोयगाव येथे हरिभक्त परायण उत्तम महाराज गाडे यांचे कीर्तन व महाप्रसाद, स्वर्गीय शंकरावजी कोल्हे यांच्यासोबत काम केलेल्या वयोवृद्ध नागरिकांचा सत्कार, रुग्णांना फळे वाटप,शालेय साहित्य वाटप, खाऊवाटप असे विविध उपक्रम प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोपरगाव मतदारसंघात राबविण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने सुरेगाव, वेळापूर,कारवाडी,मंजूर,हांडेवा
जनतेच्या प्रश्नासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या धुरंधरांच्या यादीत अग्रस्थानी स्व. शंकरराव कोल्हे यांचे नाव आवर्जून घेतले जाते.अतिशय तळमळीने विविध क्षेत्रात अभ्यासपूर्ण पावले टाकून सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवण्यात त्यांचे योगदान आहे.महाराष्ट्रात एक कार्यतत्पर नेते अशी ओळख आपल्या हरहुन्नरी स्वभावाने त्यांनी मिळवली होती.मतदारसंघ आणि परिसरातील त्यांना मानणाऱ्या मोठ्या वर्गाचे जाळे आहे. स्व.कोल्हे यांना आदरांजली म्हणून शेकडो ठिकाणी उपक्रम आयोजित करून प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.







