भव्य कलश मिरवणुकीने होणार माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब पुण्यस्मरण सप्ताहाला सुरवात
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांचे तृतीय पुण्यस्मरण आणि जयंतीचे निमित्ताने धार्मिक कथा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दिनांक १६ मार्च पासून २३ मार्च पर्यंत प्रभू श्रीराम कथा साध्वी ह.भ.प.सोनालीदीदी कर्पे यांच्या अमृतवाणीतून पार पडणार असुन या सप्ताहिचि शहरातुन भव्य कलश मिरवणूक संत
महंताच्या उपस्थितीत सायं. ५.३० वा काठून आज सुरुवात होणार असल्याची माहीती सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आली.
कोपरगाव तहसील मैदान येथे या कथा सोहळ्याचे आयोजन केलेले असुन या कथेमध्ये विविध प्रसंग साकारले जाणार असून माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांनी कोपरगावसह महाराष्ट्रात केलेल्या कार्याचे स्मरण या निमित्ताने घडणार आहे.
गतवर्षी सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.आयोजन नियोजन यात हा सोहळा उल्लेखनीय मानला जातो त्यामुळे यावर्षी होणाऱ्या प्रभू श्री राम कथा श्रवणासाठी तालुक्यातील भाविकांनी सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.






