banner ads

ईद आनंद, प्रेम, आणि ऐक्याचे प्रतीक -आ. आशुतोष काळे

kopargaonsamachar
0

 ईद आनंद, प्रेम, आणि ऐक्याचे प्रतीक -आ. आशुतोष काळे


आ काळेंच्या मुस्लीम बांधवाना ‘रमजान ईद’ च्या शुभेच्छा
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

 कोपरगाव शहरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ‘रमजान ईद’चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदान व अक्सा मस्जिद येथे सामुदायिक नमाज पठण केले. याप्रसंगी आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून सर्व मुस्लीम बांधवाना ‘रमजान ईद’ च्या शुभेच्छा देवून त्यांची गळाभेट घेतली.

यावेळी सामाजिक समर्पण आणि परस्पर मदतीला प्रोत्साहन देणाऱ्या ईद च्या शुभेच्छा देतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, पवित्र रमजान महिना उपवास, प्रार्थना, आणि एकतेचा काळ आहे. त्याचबरोबर हा महिना आत्मशुद्धी आणि समाजातील गरिबांना मदतीचा संदेश देतो. एकमेकांच्या मदतीचा आणि समर्पणाचा बहुमुल्य संदेश देणाऱ्या  रमजान महिन्याची सांगता होत असतांना येणारा ‘रमजान ईद’ चा सण आनंद, प्रेम, आणि ऐक्याचे प्रतीक असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

यावेळी मुस्लिम समाजबांधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.



 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!