banner ads

कोपरगांवात पक्षांना पिण्याचे पाण्यासाठी मातीची भांडी

kopargaonsamachar
0

 कोपरगांवात पक्षांना पिण्याचे पाण्यासाठी मातीची भांडी

जागतिक चिमणी दिवस निमित्ताने उपक्रम


कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

 वाढते तापमानाने प्रत्येक सजीव पिण्याच्या पाण्यासाठी कासावीस होत आहे. अशा वेळी पक्षांचा नैसर्गिक अधिवास असलेल्या झाडांवर त्यांना पाणी पिण्यासाठी मातीची भांडी कोपरगांव येथील काही शाळांमध्ये वितरण करण्यात आली आहे. 
सामाजिक वनीकरण कार्यालय कोपरगांव वतीने नागरिकांना लोकसहभागातून उपक्रमांना प्रेरित करण्यासाठी कोपरगांव येथील विद्याप्रबोधिनी शाळा, डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालय यासह हरित सेनेत कार्यरत शाळांमध्ये पाणी पिण्यासाठी मातीची भांडी प्रातिनिधिक वितरण करण्यात आली आहे. नागरिकांनी लोकसहभागातून असा उपक्रम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे, वनपाल सुनिता यादव, महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके, डाॅ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब शिंदे, हरित सेना विभागप्रमुख प्रशांत घोटकर, सहाय्यक वेणुगोपाल आकलोड, अरुण बोरणारे विद्या प्रबोधिनीचे मुख्याध्यापक दत्तात्रय गवळी, नितीन शेटे, अमोल देवकर, स्वाती शेंदुर्णीकर यांचे सह शालेय विद्यार्थी उपस्थित होते. 
वाढते शहरी उद्योगिकरणामुळे वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असून त्याचा विपरीत परिणाम जीवसृष्टीवर होत आहे.निसर्गावर अवलंबून असलेल्या पशू, पक्षी, झाडे वेली यांचे जगणे असह्य होत आहे. अशा परिस्थितीत जीवसृष्टीतील महत्वाचा घटक चिमणी जगवुन संवर्धन आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी "घर तेथे चिमणी घर" यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असल्याचे आवाहन केले आहे. 

.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!