सबआॕर्डीनेट इंजिनियर असोसिएशनच्या पहिल्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक संपन्न
छुप्या खाजगीकरणास स्पष्ट विरोध
वेळप्रसंगी तीव्र आंदोलन उभारण्याची तयारी
सदर कार्यकारणीस अध्यक्ष लक्ष्मण राठोड , सरचिटणीस संतोष खुमकर ,उपाध्यक्ष संजय पाटील व संघटनेचे संघटक नारायण चकोर उपस्थित होते. या प्रसंगी आहिल्यानगर मंडळ विभाजन हा विषय अनेक दिवसांपासून मुख्य कार्यालयात भिजत पडलेला असून तो जलद गतीने कसा सोडवला जाईल यावर विचारमंथन करण्यात आले. तिन्ही कंपन्यामधील प्रलंबित आणि जिव्हाळच्या पेन्शन या मुद्यावर चर्चा करण्यात आली व त्या संदर्भात कोणती पावले उचलली जावीत यावर निर्णय घेण्यात आला.तिन्ही कंपन्यांमधील बदली धोरणाबाबत एकतर्फी होत असलेल्या निर्णयात विरोध करून त्याबाबत सुस्पष्टता यावी याबाबत एकमत घेण्यात आले व महावितरण कंपनीमध्ये येऊ घातलेल्या रिस्ट्रक्चरिंग बाबत संघटनेने मांडलेल्या प्रस्तावावरच संघटना महावितरण कंपनीस मान्यता देइल असे आश्वासित करण्यात आले.AMISP मीटर च्या माध्यमातून छुप्या खाजगीकरणास स्पष्ट विरोध असून त्यास्तव प्रसंगी तीव्र आंदोलन उभारणीची तयारी करावी लागेल असे प्रतिपादन पद अधिकाऱ्यांनी केले. कंपन्यांमध्ये सरळ पद भरती व रखडलेल्या पद भरतीचा मार्ग लवकरात लवकर मोकळा करावा यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण राठोड यांनी सांगितले .महापारेषण कंपनी मधील टीबीसीबी बाबत सखोल चर्चा करण्यात आली तिन्ही कंपन्यांमध्ये असलेले कनिष्ठ अभियंता पदाबाबत असलेली अनियमित्ता, पारेषण कंपनीत असलेल्या स्टाफ सेटअप बाबत असलेला गोंधळ तसेच एनटीपीसीच्या धर्तीवर महानिर्मितीत केली जाणारी भरती यावर विचारविनिमय करण्यात येऊन महाराष्ट्रातील तिन्ही कंपन्यांमध्ये असलेले अभियंत्यां सोबत सब ऑर्डीनेट इंजिनिर असोसिएशन कायम उभे राहून सभासदांचे मनोधैर्य बळकट करेल अशी ग्वाही संघटनेच्या चारही शिखर पद अधिकाऱ्यांनी दिली. सदर कार्यक्रमाचे उदघाटन मुख्य अभियंता नाशिक परिमंडळ सुंदरराव लटपटे यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता रमेश पवार आहिल्यानगर तसेच मंडळातील सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सहसचिव आहिल्या नगर धीरज कुमार गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र घाडगे आणि कार्यक्रमाचे आभार प्रदीप गुंजाळ यांनी मानले..






