banner ads

खिलाडूवृत्तीमुळे यशा बरोबरच अपयश पचविणेही शक्य होते-

kopargaonsamachar
0

 खिलाडूवृत्तीमुळे यशा  बरोबरच अपयश  पचविणेही शक्य होते-उपजिल्हाधिकारी सायली सोळंके

संजीवनी  मध्ये राज्यस्तरीय टेबल टेनिस व बॅडमिटन मुलींच्या स्पर्धा संपन्न

कोपरगांव ( लक्ष्मण वावरे ) 

खेळ आपल्याला खिलाडूवृत्ती शिकवितो. खेळात आपण सहभागी झालोच पाहीजे. कारण खेळातुन मिळणारी खिलाडूवृत्ती यशाबरोबरच अपयश  पचविण्याची क्षमता निर्माण करते. खेळामुळे बौधिक क्षमता वाढीबरोबरच, एकग्रता व सांघिक काम करण्याची सवय लागते, ती जीवनात अत्यंत महत्वाची असते, असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीमती सायली सोळंके यांनी केले.

           इंटर इंजिनिअरींग डीप्लामा स्टूडन्टस् स्पोर्टस् असोसिएशन (आयईडीएसएसए), महाराष्ट्र  राज्य प्रायोजीत व संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निक आयोजीत राज्य स्तरीय आंतरविभागीय मुलींच्या बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमती सोळंके प्रमुख पाहुण्या म्हणुन बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब कोपरगांव सेंट्रलचे अध्यक्ष  राकेश  काले, प्राचार्य ए. आर. मिरीकर, रजिस्ट्रार  नानासाहेब लोंढेे, आदी, उपस्थित होते. सदर प्रसंगी राज्यभरातुन आलेले संघ प्रमुख, दोनही स्पर्धांचे विविध पॉलीटेक्निक व डी.फार्मसी संस्थांमधुन आलेल्या बॅडमिटनचे १२ संघ व टेबल टेनिसचे ९ संघ मिळुन एकुण १४० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
प्रारंभी उद्घाटनापुर्वी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी संस्थेच्या सभागृहामध्ये श्रीमती सोळंके  व श्री काले यांचे स्वागत करून विविध विषयांवर वैचारिक  अदान प्रदान केले, तसेच श्री कोल्हे यांनी संजीवनी अंतर्गत विविध उपलब्धींची माहिती दिली. यावर श्रीमती सोळंके यांनी समाधान व्यक्त करून संजीवनीच्या संस्था ग्रामिण भागात असुनही चौफेर प्रगतीचे कौतुक केले.  
             उद्घाटन प्रसंगी प्रास्तविक भाषणात प्राचार्य मिरीकर खेळाडूंना उद्देशून  म्हणाले की येथे सर्व जण विभागीय पातळींवरून जिंकुन आलेले आहात. त्यामुळे खिलाडूवृत्ती सर्वांच्यात आहे. येथे राज्य स्तरीय स्पर्धा आहेत, त्यामुळे येथिल यश  अपयशाची  तमा न बाळगता आपला खेळ उत्कृष्ट  झाला पाहीजे, याकडे लक्ष केंद्रीत करावे. संजीवनी अंतर्गत विविध संस्थांची माहिती देत ते म्हणाले की काळानुरूप सर्व सस्ंथा आवश्यक  ते बदल करीत असुन त्यामुळे सर्वच संस्थांचा नावलौकिक वाढत आहे.
           श्रीमती सोळंके पुढे म्हणाल्या की जेवढे मोठे खेळाडू आहेत, तेवढी त्यांच्या पाठीमागे प्रचंड मेहनत आहे. शासनाने शासकिय, निमशासकिय, जिल्हा परीषद, सहकारी संस्था, इत्यादींच्या नोकर भरतीसाठी राज्य व देश  पातळीवरील विजयी खेळाडूंसाठी नोकरीत ५ टक्के आरक्षित केलेल्या आहेत, याचाही फायदा खेळाडूंनी घ्यावा.
            या स्पधामर्ध्येे बॅडमिंटन मध्ये शासकिय तंत्रनिकेतन, अहिल्यानगरच्या संघाने प्रथम विजेते पद पटकाविले. विद्या अलंकार तंत्रनिकेतन, मुंबईच्या संघाने उपविजेते पद मिळविले. टेबल टेनिस स्पर्धांमध्ये मुंबईच्या विद्या अलंकार तंत्रनिकेतनने प्रथम क्रमांक किळविला तर शासकिय तंत्रनिकेतन, वाशीमचा संघ उपविजयी ठरला. मनोज जगदाळे, रोहीत लोखंडे, प्रणित बाविसकर, निलम परांडे, शरयू शेटे  व अभी हजारे यांनी पंच म्हणुन काम पाहीले. स्पर्धा यशस्वी  करण्यासाठी संस्थेचे क्रीडा शैक्षक  प्रा. शिवराज  पाळणे, डॉ. गणेश  नरोडे, सत्यम कोथळकर व प्रा अक्षय येवेले यांनी विशेष  परीश्रम घेतले.प्रा. आय. के सय्यद यांनी  सुत्रसंचालन करून आभार मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!