मंजुर हंडेवाडी सोसायटीच्या संचालकपदी केशवराव कोकाटे
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
तालुक्यातील राजकीय दुष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मंजुर हंडेवाडी सोसायटीचे संचालक कै. संजय तुकाराम कोकाटे हे मयत झाल्यामुळे त्यांची जागा रिक्त झाल्याने या जागेवर केशवराव रघुनाथ कोकाटे यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
त्यांच्या नावाची सुचना भास्करराव श्रीपतराव तिरसे यांनी मांडली त्यास शिवाजीराव कारभारी घुमरे यांनी अनुमोदन दिले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन कोपरगाव तालुक्याचे सहाय्यक निबंधक एन.जी. ठोंबळ व आर एन रहाणे हे उपस्थीत होते.
सदर निवडीबाबत संजिवनी उद्योग समूह अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक व युवा नेते विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले.



.jpg)




