बंदुकीचा धाक दाखवून साई भक्तांना लुटणारी टोळी जेरबंद
सात आरोपींकडून नऊ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
शिडी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बंदुकीचा धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद करण्यात शिर्डी पोलिसांना यश आले असुन याअगोदर सदर टोळीने अहिल्यानगर, घोटी, वैजापूर येथील ४ दरोडयाचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले पोलिसांनी पकडलेल्या ७ आरोपीकडून ९.६४,००० रू. कि. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यातील पकडलेले आरोपी हे श्रीरामपूर व कोपरगाव तालुक्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले .
, दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वा.सुमारास मोहित महेश पाटील, वय २५, रा. दिडोली, ता. चोरीयासी, जि. सुरत, गुजरात हे कारने प्रवास करत असताना अज्ञात आरोपीनी इटिंगा कारने आडवून, त्यांना गन, गुप्ती व कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागीने व मोबाईल असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ४०/२०२५ बीएनएस कलम ३१० (२), १२६ (२), ३५२, ३५१ आर्म अॅक्ट ३/२५, ४/२५ प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल केला होता त्या अनुशंगाने
पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी घडलेल्या दरोडयाच्या गुन्हयांची माहिती प्राप्त होताच पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना गुन्हयाचा तपास करण्याचे आदेश दिले.
त्यानुषंगाने पोलिस निरीक्षक . दिनेश आहेर , सहाय्यक पोलिस निरीक्षक हमेत थोरात व पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, बाळासाहेब नागरगोजे,इरफान शेख, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, रमीजराजा आत्तार, रोहित वेमुल, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने
१९ फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा विजय गणपत जाधव, रा.श्रीरामपूर याने त्याचे साथीदारासह केला असून ते पांढरे रंगाची इर्टिका कारमधुन लासलगाव येथून शिडीच्या दिशेने येत आहेत. पथकाने कारवाडी फाट्याजवळ सापळा रचून वाहनास थांबवून, वाहन चालक व कारमधील इसमांना ताब्यात घेऊन, त्यांना नावे विचारली असता त्यांनी त्यांचे नावे विजय गणपत जाधव, वय २९, रा.गोंधवणी रोड, वॉर्ड नं.१. श्रीरामपूर, अहिल्यानगर ,सिध्दार्थ भाऊसाहेव कदम, वय २९, राहुल संजय शिंगाडे, वय ३५ , सागर दिनकर भालेराव, वय ३० , समीर रामदास माळी, वय २६ ,दोन विधीसंघर्षित बालक अ.क्र.२ ते ६ सर्व रा. पोहेगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.
त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातून नऊ लाख - रू किं. पांढरे रंगाची इर्टिका कार क्रमांक एमएच-४१-की-२८१७, ४५,००० रू किं. त्यात ३ मोबाईल, ११ हजार- रू कि. त्यात दोन एअर गण, ३,०००- रू किं. ३
लोखंडी कत्ती, १,००० रू किं. एअर गण छरे असलेली डबी, ४,०००- रू कि. त्यात पिवळया धातुच्या अंगठया व चैन असा एकुण ९,६४,००० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच आरोपींनी त्यांचेकडील जप्त करण्यात आलेल्या हत्याराने चार चाकी गाडीच्या काचा फोडून सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती सांगत. संगमनेर तालुका, घोटी, जि. नाशिक व वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हे केल्याची कबुलीही दिली आरोपींनी सांगीतलेल्या माहिती वरून दरोडा व जबरी चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हयातील रोख रक्कम आपसामध्ये वाटुन घेतली असून सोन्या चांदीचे दागीने हे नाशिक येथील राजेंद्र बंधु यांना विक्री केले व त्यातुन आलेली रक्कम देखील एकमेकांत वाटुन घेतली असल्याची माहिती सांगीतली.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक. राकेश ओला,
अपर पोलीस अधिक्षक वैभव कुलबर्म,
, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.
ताब्यातील आरोपीना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुरनं ४०/२०२५ या गुन्हयाचे तपासकामी मुद्देमालासह कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात असून गुन्हयाचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.




.jpg)




