पाथरवट समाजाचा राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
नाशिक येथे अखिल पाथरवट व तत्सम समाज सेवा संस्था, नाशिक आयोजीत भव्य राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात
संपन्न झाला.
महाराष्ट्रात पाथरवट समाज हा शिल्पकार म्हणून परिचित असताना राज्यात विविध भागांमध्ये तो विखुरलेला आहे. विखुरलेला समाज एक संघ करण्यासाठी पाथरवट समाजाच्या समाज बांधवांनी एकत्र येत या वधु-वर-पालक मेळाव्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्ञानेश्वर लहाणे होते .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव कूडके,राजाराम डोंगरे,अॕड जी. पी. चव्हाण,विवेक भोईर ,प्रशांत टोरपे,दिनेश भोईर,किशोर फुनगे, अजय मराठे,नारायण मलेटे,विलास कुडके,मोहन महाराज भगत,हरीश चव्हाण,प्रभाकर भोईर,दिगंबर शेळके,महेंद्र आमले,संजय सकडे, भाऊलाल कुडकें, युवराज शेरे, दत्तात्रय गवळी,नंदकिशोर टोरपे,सुनील भगत संतोष भोपी,सचिन लाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
४५० पेक्षा जास्त वधु वरांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पाथरवट समाज पंच मंडळ नाशिक, पाथरवट समाज सेवा मंडळ,बेट-कोपरगांव सह नगरसुल, पुणतांबा,श्रीरामपूर, संगमनेर, नंदुरबार, शहादा येथील समाज बांधवांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन संस्थेचे सचिव हेमंत भोईर यांनी केले तर आभार संचालक सुवर्णा मराठे यांनी मानले.