banner ads

सोयाबीन खरेदीचे पेमेंट शेतक-यांच्या खात्यात जमा.

kopargaonsamachar
0

 सोयाबीन खरेदीचे पेमेंट शेतक-यांच्या खात्यात जमा.-- सभापती.साहेबराव  रोहोम



कोपरगांव ( लक्ष्मण   वावरे )

कृषि उत्पन्ऩ बाजार समिती कोपरगांवच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरील ५५६ शेतकरी वर्गाने ८५९० क्विंटल (१७१८० गोणी)  सोयाबीन शेतमाल विक्री केलेला असुन त्यापैकी ३०५ शेतकरी वर्गाने विक्री केलेल्या ४७९७ क्विंटलचे पेमेंट ४८९२ ने रक्क़म रुपये २,३४,६६,९२४,रुपये  शेतकरी वर्गाच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती सभापती  साहेबराव रोहोम व उपसभापती .गोवर्धन  परजणे यांनी दिली आहे
शासनाने सन २०२४-२५ करिता सोयाबीन या शेतीमालाचा आधारभुत दर रूपये ४८९२ रुपये जाहिर केला असुन कोपरगांव तालुक्यातील शेतक-यांसाठी कृषि उत्पन्ऩ बाजार समिती कोपरगांवच्या मुख्य़ मार्केट यार्ड या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रावर शासनाच्या सन २०२४-२५ या वर्षाकरिता आधारभुत दर रूपये ४८९२ रुपये  या प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी केली आहे. सध्या सोयाबीनचे भाव पडलेले असल्याने यामुळे सोयाबीन उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कृषि उत्पन्ऩ बाजार समिती कोपरगांवच्या मुख्य़ मार्केट यार्ड या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या उर्वरित शेतकरी वर्गाची ३७९३ क्विंटल सोयाबीन खरेदीची रक्क़म रूपये १,८५,५५,३५६ रुपये सात दिवसात शेतकरी वर्गाच्या बँक खात्यावर वर्ग होईल अशी माहिती बाजार समितीचे सचिव.नानासाहेब रणशुर यांनी दिली आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!