banner ads

अधिकारी जर पैसे मागत असतील माझ्याशी संपर्क करा

kopargaonsamachar
0

 अधिकारी जर पैसे मागत असतील माझ्याशी संपर्क करा --- आ.काळे


पोलीस प्रशासन नागरिकांना वेठीस धरीत असेल तर खपवून घेणार नाही
   - आ.काळेंच्या पोलीस प्रशासनाला कडक शब्दात सूचना

 कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

आपल्याला आधार मिळेल आणि आपल्यावर होणारा अन्याय दूर होईल व आपल्याला न्याय मिळेल या आशेपोटी नागरीक पोलीस प्रशासनाकडे आपल्या अडचणी व तक्रारी घेवून येत असतात. या तक्रारी व अडचणी सोडवून नागरीकांना आधार देण्याचे काम हे पोलीस प्रशासनाचे आहे. जर पोलीस प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना आधार देत नसेल व ठराविक नागरिकांच्याच तक्रारी घेत असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे. या नागरीकांना आधार देण्याचे सोडून याउलट अडचणी घेवून घेणाऱ्या नागरिकांच्या अडचणी न सोडविता पोलीस प्रशासन जर नागरीकांना वेठीस धरीत असेल तर खपवून घेणार नाही असा सज्जड ईशारा आ.आशुतोष काळे यांनी पोलीस प्रशासनाला तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात दिला.
जनता दरबारात नागरिकांना प्रत्येक विभागाच्या समस्या मांडण्यासाठी येणाऱ्या अडचणींची दखल घेवून विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आ.आशुतोष काळे विविध शासकीय विभागाचे स्वतंत्रपणे जनता दरबार घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवार (दि.२८) रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे महावितरण,राज्य परिवहन महामंडळ,रेल्वे विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागाच्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेतला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना करतांना ते बोलत होते. यावेळी स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा आ. आशुतोष काळे यांनी निषेध व्यक्त करून या घटनेतील आरोपीला कडक शिक्षा व्हावी असे ते म्हणाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव बस स्थानक व कोपरगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी व संपूर्ण परिसर सी.सी.टी.व्ही.च्या निगराणीखाली ठेवून या सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांच्या नाईट व्हिजनची क्षमता तपासावी अशा सूचना पोलीस प्रशासनाला व बस स्थानक व कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबारात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तालुक्यातील  जनतेच्या समक्ष अधिकाऱ्यांना नागरिकांचे प्रश्न का प्रलंबित राहत आहेत याचा जाब विचारून हे प्रश्न शिल्लक राहता कामा नये अशा सूचना दिल्या.या जनता दरबाराला देखील आजपर्यंत झालेल्या जनता दरबाराप्रमाणे नागरीक आपल्या समस्या घेवून मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समस्यांमध्ये सर्वात जास्त समस्या पोलीस प्रशासन व महावितरण विभागाच्या होत्या. त्याचबरोबर चोरीच्या घटना, पोलीस वेळेत पंचनामा करीत नाही, शेतकऱ्यांच्या वीज पंप व केबल चोरीचे वाढलेले प्रमाण, बस वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान, शटल बस सेवा सुरु करणे, पथ दिवे लावणे, महावितरण अधिकाऱ्यांच्या तक्रारी, आदी प्रश्नांबाबत नागरिकांनी आपल्या समस्या या जनता दरबारात आ.आशुतोष काळे यांच्यापुढे मांडल्या.

          यावेळी बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी माझा पाठपुरावा असून विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या वेळेत सुटत आहे याचे समाधान आहे. अजूनही काही विभागांचे जनता दरबार घेणे बाकी असून जनता दरबाराच्या माध्यमातून त्या विभागाच्या देखील नागरिकांच्या समस्या शिल्लक राहणार नाहीत.नागरिकांची कोणत्याही विभागाची कामे नियमात असतील तर कोणत्याही अधिकाऱ्याला पैसे देण्याची गरज नाही. असे अधिकारी जर पैसे मागत असतील माझ्याशी संपर्क करा किंवा माझ्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा तुमच्या अडचणी सोडविल्या जातील. जनता दरबार सुरु राहतील या जनता दरबारात नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात द्याव्यात.जेणेकरून त्याबाबत त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारता येईल व चुकीचे कोण आहे याचा शोध घेवून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगत अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे नागरिकांचे नुकसान होणार नाही याची शासकीय अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.


          यावेळी कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कोपरगाव शहर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंता संगमनेर  विनायक इंगळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड, राहाता महावितरणचे उपकार्यकारी अभियंता डी.डी. पाटील, सहाय्यक अभियंता धांडे, सचिन बेंडकुळे, कोपरगाव बस डेपो आगार प्रमुख अमोल बनकर आदींसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, संलग्न संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                             
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!