banner ads

दहेगाव बोलका चौफुली बनली मृत्यू चा सापळा

kopargaonsamachar
0

 दहेगाव बोलका चौफुली  बनली मृत्यू चा सापळा

 गतिरोधक बसविण्याची मागणी

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

मुंबई नागपूर महामार्गावर दहेगाव चौफुली येथे गतिरोधक बसविणे तातडीने गरजेचे आहे.शालेय विद्यार्थी आणि नागरिक यांना अतिवेगाने जाणाऱ्या महामार्गावरील वहानांमुळे दैनंदिन वहिवाट करणे अडचणीचे होत आहे. अनेक अपघात गतिरोधक नसल्याने नजीकच्या काळात या जागेवर झाले आहे ही चौफुली आता जणू मृत्यूचा सापळा बनली असुन या चौफुलीवर 
 तात्काळ गतिरोधक बसवण्याची मागणी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक त्र्यंबकराव सरोदे यांनी केली आहे.

वेगवान महामार्ग हे दळणवळण करण्यासाठी सोयीचे असले तरीही अनियंत्रित वेग हा जीवावर बेतनारा ठरतो. कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका चौफुली ही नागपूर महामार्गावरील असेच धोकादायक ठिकाण गेले अनेक काळापासून बनले आहे. दूरच्या पल्ल्याच्या गाड्या वेगाने जातात त्यांना नियंत्रित करणेसाठी गतिरोधक असावा ही मागणी अनेकदा नागरिक करतात मात्र दुर्दैवाने त्यावर अद्याप कृती झाली नाही.ही समस्या सरोदे यांनी कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे आणि मा.आ.स्नेहलता कोल्हे यांच्याकडे केली असून त्यांनी संबधित महामार्ग अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली आहे.


या नुसार मुंबई नागपूर महामार्ग नॅशनल कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग संभाजीनगर यांच्याकडे सदर  विषय गांभीर्याने सोडवण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.या चौफुलीवर गतिरोधक झाल्यास अनेक अपघात टळणार आहेत असेही सरोदे शेवटी म्हणाले आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!