जेऊर पाटोदा येथे उन्हाच्या तीव्र लाटेने आगीचा भडका
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा हद्दीतील सर्व्हे नंबर ८६ मधील मारुती मंदिरा जवळ एका शेतात उन्हाच्या तडाख्यामुळे वाळलेल्या गवताला अचानक आग लागली गवताने व काटवनाने पेट घेतल्याने आग वेगाने पसरली. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दिसताच शेतकरी व ग्रामस्थांची ,मोठी धांदल उडाली होती सदर घटना गुरुवार दुपारी १२ वाजल्याच्या सुमारास घडली असुन कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
आग लागताच सरपंच सतिष केकाण व भाऊसाहेब भाबड यांनी कोपरगाव नगरपालिका व संजीवनी उद्योग समुहाच्या अग्निशमन विभागाशी संर्पक साधत घटनेची माहिती दिली माहिती मिळताच कोपरगाव नगरपरिषद व संजीवनी उद्योग समूहाच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. सुदैवाने घटना स्थळा जवळच अनिल भाबड,भाऊसाहेब भाबड,समाधान केकाण,विष्णू केकाण,शंकर केकाण यांचे २५ ते ३० एकर काठणीला आलेल्या गव्हाचे क्षेत्र होते गव्हाच्या पिकाला कोणताही धोका पोहोचला नाही
आगीत झुडपे आणि काटवन जळून खाक झाले, मात्र मोठे नुकसान टळले. सध्या उन्हाचा पारा सतत वाढत असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.






