banner ads

कोपरगावातील अतिक्रमणे शुक्रवार २१ रोजी निघणार -

kopargaonsamachar
0

कोपरगावातील अतिक्रमणे  शुक्रवार  २१ रोजी  निघणार - 

येणारा खर्चाचा बोजा उता-यावर चढवणार - मुख्याधिकारी

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव शहरातील अतिक्रमण काढण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या नोटिसीचा अवधी संपल्याने शुक्रवार २१ फेब्रुवारी  रोजी निघणाऱ्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेचे प्रशासक सुहास जगताप ,उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे ,तालुक्याचे पोलिस निरीक्षक  संदीप कोळी, आदी पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव शहरातील मुख्य बाजारपेठेतुन ते  येवला नाका परिसरात गुरुवार २० रोजी रूट मार्च करत पाहणी करून दि.२१ शुक्रवार रोजी निघणाऱ्या अतिक्रमण मोहिमेबद्दल संबंधितांना पुन्हा एकदा तोंडी सूचना  दिल्या आहेत .

त्यामुळे उद्या अतिक्रमण निघणार आहे असे प्रशासक सुहास जगताप यांनी सांगितले आहे त्यासंदर्भात बोलताना सुहास जगताप म्हणाले की कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमण निर्मुलन मोहिम ही सुरु करण्यात   आलेली आहे सर्व सर्वेक्षण करून मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना नोटीसा देऊन या नोटीसीची मुदत संपल्याने दिनांक २१ फेब्रुवारी पासुन कारवाई करणार असुन ही कारवाई करीत असताना ज्या ज्या ठिकाणी नोटीस दिल्या आहे त्या सर्व ठिकाणांवरती कारवाई होईल तरी सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्त्यांनी २१ रोजी सकाळ पर्यंत आपल्या अस्थापना असतील त्या अस्थापना अतिक्रमण मुक्त करायच्या आहे जेणे करुण कोणाचे नुकसान होणार नाही 
  आणि नगर परिषदेला सहकार्य  करायचे आहे .नाही केलं तर नगर परिषदेने जी कारवाई ठरवलेली आहे त्याप्रमाणे सर्वावरती सरसगट कोणताही भेदभाव न होता  कारवाई होईल आणि या ठिकाणी शहरांमध्ये जे रस्ते आहेत ते अतिक्रमण मुक्त केले जाईल .या कारवाईला  शहरातील प्रमुख  रस्ते लहान पुला जवळुन ते येवला नाका त्यानंतर साई तपोभुमि पर्यत  ,धारणगाव    रोड ,एस जी विद्यालय रोड,कृषी उत्पन्न  बाजार समिती चा रस्ता, बैल बाजाराकडे जाणारा रस्ता या प्रमुख रस्त्यांवरती पहिल्या टप्प्यात   कारवाई होणार आहे .तरी सर्व नागरिकांनी आपआपले आस्थापना असतील जे अतिक्रमणे असतील ते तत्काळ हटवून घ्यायचे आहे .
ज्यांना दिलेल्या नोटीसा आहे त्यांचे अतिक्रमण काठायला जो खर्च येईल तो त्यांच्या कडून वसुल केला जाईल त्यांच्या उता-यावर बोजा चठवून वसुल केला जाईल आसे सांगितले .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!