banner ads

अनैतिक संबंधात पाच वर्षीय मुलगा ठरला अडथळा ! प्रियकराच्या मदतीने आईनेच पोटच्या मुलाला कायमचे संपवले

kopargaonsamachar
0

 अनैतिक संबंधात पाच वर्षीय मुलगा ठरला अडथळा !  प्रियकराच्या मदतीने आईनेच पोटच्या मुलाला कायमचे संपवले


महिलेसह प्रियकराला अटक

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

कोपरगाव तालुक्यातील चासनळी परिसरात दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी सव्वा चार वर्षीय मुलाचा गोदावरी नदी पात्रात मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या चिमुकल्याचा खून झाल्याचे  उघड झाले होते. प्रेम संबंधात मुलाचा अडथळा निर्माण होत असल्याने मुलाची आई आणि तिच्या प्रियकरानेच मिळून या मुलाचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले असून, कोपरगाव तालुका पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या. 

प्राप्त माहितीनुसार, आरोपी नामे शितल ज्ञानेश्वर बदादे आणि तिचा प्रियकर सागर शिवाजी वाघ यांनी अनैतिक संबंधात आड येत असल्याने शितलचा मुलगा कार्तीक ज्ञानेश्वर बदादे वय ४ वर्षे ३ महिने रा. साकुरेमिंग ता निफाड जि नाशिक याचा निर्दयपणे काटा काढण्याचा कट रचला.व  २० डिसेंबर रोजी या दोघांनी चिमुकल्याला पांढऱ्या कपड्यांत गुंडाळून, हातपाय बांधून चासनळी येथे गोदावरी नदी पात्रात फेकून दिले.घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.

उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखालील पोलिस निरीक्षक संदिप कोळी यांनी वेगवेगळी    पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते

 दिनांक ०८/०२/२०२५ रोजी यातील महिला आरोपी शितल ज्ञानेश्वर बदादे ही दिंडोरी येथे आली असल्याची माहिती पोलिसांना  बातमीदारा  मार्फत मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन तपास करुन तिचा शोध घेतला असता ती मिळून आल्याने तीस ताब्यात घेऊन तिचा प्रियकर सागर शिवाजी वाघ याचे ठावठिकाण्याबावत माहिती घेतली असता तीने तो भऊर ता. देवळा जि. नाशिक येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा सदर भागात जाऊन रात्रभर प्रयत्न केल्यानंतर दिनांक ०९/०२/२०२५ रोजी सकाळी तो मिळून आला असुन त्यांना दोघांनाही ताब्यात घेतले आहे व त्यांना विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असुन प्रेमात अडसर नको म्हणून सदर मुलाचा खुन केला   आहे.


सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक राकेश ओला,  अप्पर पोलीस अधिक्षक  वैभव कल्लुवमें, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग  शिरीष वमने. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  संदीप कोळी, पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, पो उप निरीक्षक कमलाकर चौधरी, पोहेको  संदीप देवराम बोटे ,पोहेकॉ  मधुसूदन भानुदास दहिफळे, पोकों नवनाथ गुंजाळ, पोकों रमेश झडे, पोकों/राजु शेख पोकों/नवाळी, पोकों/ युवराज खळे, पोकों/ किसन सानप, व अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर यांचे कार्यालयाकडील पोकों/सचिन धनाड यांचे पथकाने केली असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक  संदीप कोळी हे स्वतः करीत आहेत.याअमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!