banner ads

जनतेने आपल्याला आमदार केले तालुक्याचे मालक नाही.

kopargaonsamachar
0

 जनतेने आपल्याला आमदार केले तालुक्याचे मालक नाही... सरपंच अलका जाधव 


ग्रामसेवकाचा तात्काळ राजीनामा मागणं हे शोभतं का ? असं वागणं बरं नव्हं 
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

 कोपरगाव पंचायत समितीत आ. आशुतोष काळे यांनी जनता दरबार आयोजित केला होता. या जनता दरबारात औताडे गटाकडे म्हणजे विरोधात असलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना एकाला ना हरकत दाखला न दिल्यामुळे व का दिला नाही याची शहानिशा न करता 
आर एस टिळेकर यांना धारेवर धरत सर्वांसमोर अपमानित केले. तात्काळ राजीनाम्याची  मागणी केली. हे केवळ ग्रामपंचायत विरोधात असलेल्या आकासा पोटी केली. ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीत हे कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे आपली जबाबदारी निभवतात.  सालगड्याप्रमाणे भर सभेत एखाद्या अधिकाऱ्याचा अपमानित करणे आमदार साहेब आपल्याला शोभते का? हे वागणं बरं नसून आपल्याला जनतेने आमदार केले आहे. तालुक्याचे मालक होण्याचा प्रयत्न करू नका असा सल्ला पोहेगाव ग्रामपंचायतीच्या आदिवासी महिला लोकनियुक्त सरपंच अलका जाधव यांनी आ काळे यांना दिला आहे.

प्रसिद्धी पत्रकांत त्यांनी म्हटले आहे की पोहेगाव ग्रामपंचायतीने तालुक्यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या नेतृत्वाखाली  विकासाची रोल मॉडेल असताना केवळ विरोधातली औताडे गटाची ग्रामपंचायत असल्याकारणाने आपण पोहे गावच्या ग्रामपंचायतीकडे नेहमीच आकस भावनेने पाहतात. 

वास्तविक कोपरगाव तालुक्याचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना जाणीवपूर्वक एखाद्या कर्मचाऱ्याला अपमानित करून आपण कर्तव्यदक्ष असल्याचा आव आणण्याची आवश्यकता नाही. झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याची चाळण झालेली आहे. रवंदे टाकळी धामोरी या रस्त्याची देखील दुरावस्था झाली आहे. निवडणुकीच्या काळात कोपरगाव शहराला दिवसा आड पाणी देण्याची वल्गना आपण केली होती.

निवडणुकीनंतर आपल्याला याचा विसर पडला आहे. शहराला तीन-चार दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळते हा प्रश्न कधी सुटणार? पुणतांबा फाटा, बेट नाका व झगडे फाटा येथे उड्डाण पुलाचे सांगाडे उभे करून रहदारीला अडथळा ठरणाऱ्या पुलाचे काम मार्गी कधी लागणार? पुणतांबा फाटा ते साईबाबा कॉर्नर या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते असे एक ना अनेक प्रश्न असतानाही पोहेगावच्या ग्रामसेवकाला धारेवर धरून केवळ स्टंटबाजी करण्याचा आपला हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. 
पोहेगांव परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले, एटीएम लुटण्यात आले, सराफ दुकानावर दिवसाढवळ्या दरोडा पडला, या बाबतीत पोहेगाव ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे कायमस्वरूपी बंद असलेले पोलीस दुरक्षेत्र चालू करण्यासाठी केलेली मागणी. अवैद्य धंदे बंद करण्यासाठी केलेली मागणी याकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करून पोहेगाव ची सामाजिक स्थिती बिघडवण्यासाठी अवैद्य धंदे करणाऱ्या लोकांना खतपाणी घालण्याचे काम कोण करत आहे याची सर्व ग्रामस्थांना कल्पना आहे.

ना हरकत दाखल्यासंदर्भामध्ये स्थानिक प्रशासन निर्णय घेत असते. ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था असून तेथे निर्णय घेण्याचे अधिकार ग्रामस्थांनी निवडून दिलेल्या सदस्य व सरपंचांना असतात याची आपल्याला कदाचित कल्पना नसावी. पोहेगाव ग्रामपंचायती मध्ये जाणीवपूर्वक कोणाची आडवणूक होत नसून कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मासिक सभेमध्ये अवलोकन करून दाखले देण्यात येतात. प्रत्येक संस्थेमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार हे कायद्यानुसार ठरलेले आहे  विधानसभेला निवडून दिल्याने आपण या तालुक्याचे मालक झालात आणि सर्व स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार आपल्याला मिळाले असे आमदार काळे यांनी समजू नये जनतेने आपल्याला आमदार केले मालक नाही असेही शेवटी सरपंच अलका जाधव यांनी म्हटले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!