सोनेवाडीत तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदावरुनच तंटा
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत विशेष बाब म्हणून तंटामुक्त समिती गठन करण्याचा विषय प्रकर्षाने होता. मात्र मतमतांतरे यामुळे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदावरूनच रस्सीखेच झाली.
ग्रामविकास मसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शकुंतला गुडघे होत्या. तर उपसरपंच संजय गुडघे, निरंजन गुडघे यांनी सभा शांततेत होण्यासाठी आवाहन केले .मागील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे यांचा कार्यकाळ संपल्याने पुन्हा नव्याने तंटामुक्त समिती गठन करण्यासाठी विषय ग्राम विकास अधिकारी भानुदास दाभाडे यांनी घेतला. गेल्या आठ दिवसापासून जो तो आपल्या गटाचा अध्यक्ष होण्यासाठी प्रयत्न करत होता. तंटामुक्त समिती गठन करण्या अगोदरच अध्यक्षपदाची निवड होण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.
अध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांचे नाव पुढे आले. मात्र गोंधळ व अंतर्गत कहलामुळे तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदाची निवडणूक रद्द झाली. एका बाजूने काही नागरिकांनी हात वर करून अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी अशी आग्रही भूमिका धरली . तर दुसऱ्या बाजूने गुप्त मतदान पद्धतीने अध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या चिठ्ठ्या काढून अध्यक्ष निवडावा असे सांगण्यात आले.
या दोन्ही भूमिकेचे एकमत न झाल्यामुळे तंटामुक्ती समिती गठीत करण्यात अडचण आली. पुढील काळात विरभद्र बिरोबा मंदिर परिसरात विशेष ग्रामसभा घेऊन तंटामुक्त समिती गठित करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.



.jpg)




