हिंगणीच्या आदिवासी बाधवांच्या जमिनीचा प्रश्न मार्गी,
" कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे समस्या सुटली "
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
हिंगणी येथील आदिवासी बांधवांना दैनंदिन उपजिवीकेसाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शासनस्तरावर प्रयत्न करून वनविभागाच्या जमिनी मिळवून दिल्या होत्या मात्र त्यावर पोटखराबा उल्लेख असल्यांने राष्ट्रीयकृत बँका या आदिवासी बांधवांना कर्ज तसेच आर्थीक सहाय मिळविण्यांत अडचणी येत होत्या त्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी या समस्येचा पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्यांने प्रयत्न करून सदरचा प्रश्न मार्गी लावला आहे.
याबददल सर्व आदिवासी बांधवांनी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांचे आभार मानले आहे.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, संचालक विश्वासराव महाले, मनेष गाडे, आप्पासाहेब दवंगे, बाळासाहेब वक्ते, शिवाजीराव वक्ते, बाळासाहेब पानगव्हाणे, बापूसाहेब धर्मा पवार, सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर, रामदास शिंदे, दादासाहेब पवार, एडवोकेट प्रभाकर सारजाराम पवार, रामभाऊ किसन चंदनशिव, लक्ष्मण किसन चंदनशिव, आप्पासाहेब धर्मा पवार, छगन दादा पवार, पांडू पुंजा मोरे, चिल्हाजी एकनाथ पवार, संतोष एकनाथ चंदनशिव सुभाष शांताराम बर्डे, दत्तात्रय पुंडलिक पवार, हिराबाई निवृत्ती माळी, दत्तात्रय प्रभाकर पवार, लक्ष्मण सोपान पवार,काकासाहेब भास्कर पवार, त्रिभुवन अण्णासाहेब पवार, सुरेश लक्ष्मण चंदनशिव आदि उपस्थित होते.
[ जनसमस्या निवारण बैठक घेऊन युवानेते विवेक कोल्हे यांनी अनेक प्रश्नांना तडीस नेण्यासाठी केलेला पाठपुरावा हा नागरिकांना लाभदायक ठरला असून वर्षानुवर्ष रखडलेले आणि शासन दरबारी असणारे प्रश्न निकाली निघतात त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर विश्वासाची आणि समाधानाची लकेर उमटते.]



.jpg)




