banner ads

मढी खुर्द सोसायटीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडी बिनविरोध

kopargaonsamachar
0

 मढी खुर्द  सोसायटीच्या अध्यक्ष  उपाध्यक्षांच्या निवडी बिनविरोध


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

  तालुक्यातील सहकारी सोसायटी क्षेत्रात सातत्याने प्रगतीपथावर असलेल्या मढी खुर्द विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी विजयराव आभाळे यांची तर उपाध्यक्षपदी शंकरराव आभाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


मढी खुर्द विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष सुधाकर कुऱ्हाडे व उपाध्यक्ष प्रकाश आभाळे यांच्या पदाचा कार्यकाळ संपुष्ठात आल्याने त्यांनी आपल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष या दोन्ही जागेच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यक्ष पदासाठी विजयराव आभाळे यांनी तर उपाध्यक्षपदी शंकरराव आभाळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.


यावेळी मुदतीच्या आत अन्य कुठल्याही उमेदवारांचे अर्ज दाखल न झाल्याने दोन्ही पदाची निवड बिनविरोध जाहीर करण्यात येवून निवडणूक निर्णय अधिकारी रहाणे यांनी अध्यक्षपदी विजयराव आभाळे तर उपध्यक्षपदी शंकर आभाळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.   
यावेळी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजयराव आभाळे तर उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शंकरराव आभाळे यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. मढी खुर्द विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा कार्यभार स्विकारल्यानंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणाले की, मढी खुर्द सोसायटीचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्व.मोहनराव आभाळे, भाऊसाहेब कुऱ्हाडे, श्रीधर आभाळे, सोपानराव गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षापासुन सोसायटी प्रगतीपथावर असून सभासदांसाठी उल्लेखनीय काम करीत आहे. हा वारसा पुढे चालविण्यासाठी व सोसायटीला प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी सर्व संचालक व सर्व  सभासदांना सोबत घेऊन प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 


यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आ.अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.     
यावेळी मढी खुर्द विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या समस्त संचालक मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष विजयराव आभाळे व उपाध्यक्ष शंकरराव आभाळे यांचा सन्मान करण्यात आला. या निवडी प्रसंगी संचालक साहेबराव आभाळे, एकनाथ आभाळे, अजय गवळी, सुहास आभाळे, सौ.गयाबाई गवळी, सौ.पुष्पाताई आभाळे, विजय आभाळे, पोपट गोसावी, सुखदेव भागवत, लेखनिक गोरख रहाणे आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक कामी सचिव संजय दिघे यांनी सहकार्य केले.



 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!