पोहेगांव खडकी नदीवरील पुलाच्या कामाने पंचवीस गावांचे दळणवळण सुखर होणार -- नितिन औताडे
माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव बाजारपेठेला बळकटी मिळण्यासाठी तसेच राहता व कोपरगाव तालुक्यातील चासनळी पासून कोळपेवाडी देर्डे ,मढी या परिसराचा राहाता प्रवरानगर लोणी या भागाशी दळणवळण सोयीस्कर होण्यासाठी पोहेगाव खडकी नदीवरील पुलाचा उपयोग होणार आहे. होणाऱ्या या पुलामुळे पंचवीस गावांचे दळणवळण सुखर होणार असुन माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते लवकरच भूमिपूजन होणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष नितिन औताडे यांनी सांगितले .
या विषयी अधिक माहिती देताना जिल्हा अध्यक्ष नितिन औताडे म्हणाले की हा खडकी नाल्यावरील पुल तब्बल ६० ते ७० वर्षाचा असल्याने हा जीर्ण झालेला होता. पावसाळ्यातील पुराच्या पाण्यामुळे तो पूर्ण वाहून गेला होता. तेव्हा तालुक्यातील उत्तरे कडील गावांचा दक्षिणेतील पोहेगाव राहता प्रवरानगर या गावच्या नागरिकांचा नजीकच्या संपर्क तुटला होता.देर्डे कोऱ्हाळे, देर्डे चांदवड, मढी बुद्रुक ,मढी खुर्द येथील नागरिकांना पोहेगाव बाजारपेठेमध्ये येण्याची मोठी अडचण निर्माण झाली होती. दूध उत्पादकांना दूध आणण्यासाठी, शाळेतील विद्यार्थ्यांना पोहेगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी मोठी अडचण व गैरसोय झाली होती. पोहेगाव परिसरातील नागरिकांचा कोळपेवाडी कारखान्याची संपर्क करायचा म्हटलं की दूरचा मार्ग निवडावा लागत होता.
या ११ किलोमीटर लांबीचा रस्ता मंजूर करून घेतला त्याचप्रमाणे याच रस्त्यावरील खडकी नाला पुलाचे कामही होण्यासाठी तत्कालीन खासदार लोखंडे यांच्याकडे पाठपुरावा करून पुलासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून १ कोटी ६० लाख रुपये निधी मंजूर करून घेतला.या पुलाचे काम नुकतेच सुरू झाले असून तीन ते चार महिन्यात सदरचा पूल दळणवळणासाठी तयार होईल. या पुलासाठी निधी मंजूर करण्याचे काम तत्कालीन खासदार सदाशिव लोखंडे यांनीच केले आहे. या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीच करू नये असेही औताडे यांनी म्हटले आहे.




.jpg)




