banner ads

गोधेगाव सोसायटीच्या चेअरमन पदी कोल्हे गटाचे पंढरीनाथ पठाडे

kopargaonsamachar
0

 गोधेगाव सोसायटीच्या चेअरमन पदी कोल्हे गटाचे पंढरीनाथ पठाडे


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

गोधेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बापूसाहेब हरिभाऊ पठाडे व व्हा.चेअरमन सरस्वती उत्तम रांधवणे यांनी परस्पर समन्वयातून ठरल्याप्रमाणे आपला राजीनामा दिल्याने नवीन नियुक्तीसाठी प्रक्रिया पार पडली आहे.


रिक्त झालेल्या पदावर   चेअरमन पदासाठी कोल्हे गटाचे पंढरीनाथ बाबुराव पठाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांना सूचक म्हणून सरस्वती रांधवणे व अनुमोदक म्हणून भानुदास कोळसे यांनी सहकार्य केले.व्हा.चेअरमन पदासाठी काळे गटाच्या अरुणाबाई भाऊसाहेब भोकरे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी सोसायटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.


निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक ठोंबळ  व राहणे  (सहकार खाते) व शिवाजीराव दवंगे तालुका सचिव कोपरगाव यांनी काम पाहिले. त्यांना सचिव अशोक घेर व सहसचिव दत्तात्रेय कारभार यांनी सहकार्य केले.


याप्रसंगी कोल्हे गटाचे जनार्दन शिंदे,माधवराव रांधवणे,सुभाष कानडे,रवींद्र रांधवणे,बाबुराव रांधवणे,भाऊसाहेब शिरसाट,परजणे गटाचे सयाराम कोळसे,सुदामराव कोळसे,वाल्मीकराव भोकरे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते व सोसायटी सभासद उपस्थित होते.वनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे मा.आ.सौ.स्नेहलता कोल्हे,युवानेते विवेक कोल्हे आदींनी अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!