banner ads

ब्राम्हणगाव येथे बालक पालक मेळावा

kopargaonsamachar
0

 ब्राम्हणगाव येथे बालक पालक मेळावा 



कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

बालकांच्या बुद्धी व शरीराच्या वाढी बरोबरच    आईच्या स्वास्थ्यासाठी काय गरजेचे आहे , मुलांचा मोबाईल वापर टाळणे ,त्यांचे खेळ ,शिक्षण ,आरोग्य ,संगोपन आदि विषयाचे  मार्गदर्शन व्हावे यासाठी ब्राह्मणगाव चे लोकनियुक्त सरपंच अनुराग येवले व बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ रूपाली धुमाळ  यांच्या  प्रमुख उपस्थितीत ब्राम्हणगाव येथे बालक पालक मेळावा संपन्न झाला. 
सरपंच अनुराग येवले यांच्या हस्ते फित कापून व  राजमाता जिजाऊ आणि शिक्षणाच्या शिल्पकार सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन  व दीपप्रज्वलन करण्यात आलेला हा मेळावा  एकात्मिक बाल विकास सेवा योजना येसगाव  गटात  येणाऱ्या अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांच्या वतीने  आयोजित  केला होता.
यावेळी   येसगाव गटाच्या   पर्यवेशिका गीता देवगुणे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी   साखर  कारखान्याचे संचालक  श्रावण आसने ,ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब शिंगाडे , सदस्य देविदास आसने ,माजी सरपंच बाळासाहेब आहेर ,माजी सरपंच शोभाताई बनकर ,तंटा मुक्ती अध्यक्ष नानासाहेब जाधव ,शालेय समिती मा अध्यक्ष बाबासाहेब जगताप ,नानासाहेब सोनवणे ,अक्षय येवले आदी मान्यवर मान्यवर व येसगाव गटातील सर्व अंगणवाडी शिक्षिका, मदतनीसह   बालक व त्यांचे पालक  मोठ्या संख्येने   उपस्थीत होते



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!