banner ads

आज आ. आशुतोष काळेंचा जनता दरबार

kopargaonsamachar
0

  आ. आशुतोष काळेंचा जनता दरबार



कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
मतदार संघातील जनतेला शासकीय कार्यालयात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी मागील पंचवार्षिकमध्ये जनता दरबार घेवून असंख्य नागरिकांच्या समस्या सूटल्या आहेत.यापुढील काळातही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला असून आज मंगळवार (दि.०७) रोजी दुपारी ०२:०० वा. कोपरगाव तहसील कार्यालयात ते जनता दरबार घेणार आहेत . 

  मतदार संघातील बहुसंख्य नागरिकांचे अनेक शासकीय कार्यालयात विविध प्रकारची कामे असतात. त्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा महिला, जेष्ठ नागरिक, माजी सैनिक, शेतकरी अशा सर्वच स्तरातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात कामानिमित्ताने अनेकवेळा जावे लागते.शासकीय कार्यालयात येणाऱ्या मतदार संघातील नागरिकांची कामे लवकरात लवकर होण्यासाठी  येणाऱ्या अडी-अडचणी समजून घेवून या अडीअडचणी विविध शासकीय कार्यालयांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत एकाचवेळी चर्चा घडवून ते प्रश्न तातडीने सुटावे यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा जनता दरबार भरविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र गरजू लाभार्थ्यांना मिळावा. सर्वसामान्य नागरिक, महिला व जेष्ठ नागरिकांच्या समस्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांपुढे मांडून हे प्रश्न लवकरात लवकर कसे निकाली निघतील यासाठी आ. आशुतोष काळे जनता दरबार घेणार आहेत. या जनता दरबारासाठी ज्या नागरिकांच्या अडचणी आहेत अशा नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या अडचणी व तक्रारी लेखी स्वरूपात मांडाव्या. जेणेकरून कमी वेळात जास्तीत जास्त नागरिकांचे प्रश्न सुटावेत त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!