banner ads

मित्र फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद - विवेक कोल्हे

kopargaonsamachar
0

 मित्र फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद - विवेक कोल्हे




कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

 कोपरगावातील मित्र फाऊंडेशन  चे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरउदगार सहकार महर्षी शंकरराव  कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते
  विवेक कोल्हे यांनी मित्र फाऊंडेशनच्या ४७ व्या रक्तदान शिबीरा प्रसंगी  काढले.


       कोपरगाव शहरासह तालुक्यातील  ग्रामीण भागातील सदस्य असलेले मित्र फाऊंडेशनचे २००१ सालापासून तब्बल ४६ वेळा रक्तदान शिबीर भरवले आहे. संपन्न झालेल्या ४७ व्या शिबीरात  तब्बल २६८ जणांनी रक्तदान केले
यावेळी शहरासह ग्रामीण भागातील तरुणांनी सहभाग घेतला होता महत्त्वाचे म्हणजे महिलांनी सुद्धा उत्तम रित्या रक्तदानात सहभाग नोंदवला यावेळी काकासाहेब कोयटे, अमित कोल्हे,राजेंद्र झावरे, अजित शिंगी, संदीप वर्पे, साहेबराव रोहोम,सुनील देवकर,सचीन तांबे, दर्शन काले,नारायण अग्रवाल, दत्ता काले, सुनील गंगुले, विकास आढाव,,बाळासाहेब आढाव, सुनील फंड, मंदार पहाडे,  मुकुंद भुतडा, राजेंद्र वाकचौरे,फकीरराव बोरणारे दौलत वाईकर, संदिप जाधव ,विरेंद्र बोरावके, मुकुंद  काळे, आकबर शेख, अंकुश वाघ, रोहित वाघ, दिपक वाजे, फकिरराव टेके आविनाश पाठक, सागर शाह, सागर जाधव, राहुल सूर्यवंशी,कलवीर दडीयाल, शेखर कोलते,रवी कथले,संतोष होण,अनुप कातकडे, प्रशांत होण सहमित्र फाऊंडेशनचे सदस्य व नगरसेवकउपस्थीत होते.


निरव रवालिया ८८ वेळेस रक्तदान तर प्रदीप निकुंभ यांनी  ५५ वेळेस रक्तदान केले .
.


चौकट 
मित्र फाऊंडेशन आयोजित ४७ वे रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न होताना आम्हाला अत्यंत अभिमान आहे या रक्तदान शिबिरात तब्बल २६८ रक्तदात्यांनी आपले अमूल्य योगदान दिले.या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्यांचे आणि शिबिराला  उपस्थिती लाभलेल्या गावातील प्रतिष्ठित मान्यवरांचे आम्ही मन पूर्वक आभार मानतो .आपल्या योगदानामुळे अनेक गरजूंना नवीन जीवनदान मिळणार आहे तुमच्या थोड्याशा प्रयत्नामुळे आज माणुसकीचा सन्मान वृद्धिंगत झाला आहे.
वैभव आढाव
अध्यक्ष 
मिञ फाऊंडेशन
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!