banner ads

समस्या हाताळण्याचे प्रात्यक्षिक राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून मिळते.

kopargaonsamachar
0

समस्या  हाताळण्याचे  प्रात्यक्षिक राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून मिळते.-

सौ. चैताली काळे


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 – राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा प्रभाव केवळ विद्यार्थ्यांवरच नव्हे तर संपूर्ण समाजावर सकारात्मक ठरतो.त्यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक विकास होवून त्यांना समाजाच्या विविध समस्या कशा हाताळाव्यात  याचे प्रात्यक्षिक राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून मिळते. असे प्रतिपादन
जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली काळे यांनी केले.


सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजना व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील मढी खु.येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन सौ.चैताली काळे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.


या कार्यक्रम प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव आभाळे, मढी खु.चे सरपंच सुनील भागवत, श्रीधर आभाळे,सोपानराव आभाळे,प्रकाश आभाळे, सुखदेव भागवत,सौ.सुजाता कुऱ्हाडे, भाऊसाहेब कुऱ्हाडे, नामदेव गवळी, शंकर आभाळे आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 मार्गदर्शन करताना चैताली काळे म्हणाल्या की


हिवाळी शिबीरामुळे विद्यार्थ्यांना विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय समस्यांवर प्रत्यक्ष कार्य करण्याची संधी मिळते. त्यामुळे हे शिबीर केवळ विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भक्कम करण्याचे कार्य करत नाही, तर समाजात एक चांगला बदल घडवून आणण्यास मदत करून राष्ट्रीय सेवा योजना शिबीर श्रम,संस्काराबरोबरच सामाजिक कर्तव्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देते


 विद्यार्थ्यांनी मोबाईलचा मर्यादित उपयोग करून सोशल मीडियाचा वापर कमी करावा. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाला राष्ट्रासाठी काही तरी करायचे असते म्हणुन आपले व्यक्तिमत्व असे घडवा की, सगळ्यांमध्ये राहून स्वत:चे वेगळे व्यक्तिमत्व निर्माण करता आले पाहिजे यासाठी या शिबिराची शिदोरी पुढील आयुष्यात सोबत ठेवा असा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी दिला.
 मढी.खुर्द या ठिकाणी सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमदान शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ग्रामस्थांना विविध विषयांवरती मार्गदर्शन करणार आहेत यात प्रामुख्याने लिंगभाव संवेदनशीलता, जाणीवजागृती, लोकसंख्या नियंत्रण, जनजागृती,प्रधानमंत्री जनधन व विमा योजना,ऐतिहासिक स्थळ संवर्धन व स्वच्छता अभियान,पर्यावरण जैवविविधता व अधिवास संवर्धन, अन्न सुरक्षा जनजागृती, मृदा व जलसंवर्धन,अपारंपारिक उर्जा,जलस्रोत स्वच्छता व वृक्षारोपण,लोकशाहीतील सहभाग व मतदार जनजागृती असे सामाजिक विषय राबविले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.भाऊसाहेब कांबळे यांनी दिली. प्रास्तविक व स्वागत प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.उमाकांत कदम यांनी केले तर कार्यक्रम अधिकारी  प्रा.विशाल पोटे यांनी आभार मानले
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!