धामोरीत नऊ दिवस चालणार "नाथांचा गजर"
धर्मनाध बिज सोहळ्याचे आयोजन
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगांव तालुक्यातील धामोरी येथे सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र अडबंगीनाथ जन्मभूमी-तपोभूमी व दीक्षा भुमी, श्री नवनाथ मंदिर धामोरी येथे गुरुवार दि.२३ जानेवारी २०२५ ते शुक्रवार ३० जानेवारी २०२४ पर्यंत नवनाथ पारायण सोहळा व शुक्रवार दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी धर्मनाथ बीज सोहळा असा नऊ दिवस संत मंहत व भाविक भक्तांच्या उपस्थितीत नाथांचा गजर चालणार आहे.

याप्रसंगी शुक्रवार दि. २३ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ दररोज सकाळी श्री नवनाथ ग्रंथाचे पारायण होईल. बुधवार दि. २९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत अॕड राजेंद्र बदामे यांच्या शुभहस्ते शनिदेव अभिषेक होईल. गुरुवार दि. ३० जानेवारी २०२५ दुपारी ४ ते ६ प. पु. संतश्री दत्तानंदगिरी महाराज (टाकेत, घोटी) यांचे प्रवचन होईल. शुक्रवार दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७.३० वा. श्री नवनाथ ग्रंथपूजन प. पु. संतश्री चंद्रशेखरनाथ महाराज यांच्या हस्ते होईल. सकाळी ८ ते ९ वेळेत भिक्षा फेरी व श्री नवनाथ पालखी मिरवणूक, कलश पुजन होईल. सकाळी १० वा. ह. भ. प. शिवाजी महाराज भालुरकर यांचे धर्मनाथ बीजे निमित्त किर्तन होईल. सकाळी ११.४३ वा. प. पु. गुरुवर्य संतश्री रमेशगिरी महाराज हे अमृतसंदेश देतील त्यानंतर पुरातन काळापासून चालत आलेल्या आमटी भाकरेचा महाप्रसाद होईल. यावेळी कलश पुजन मा खासदार सुजयदादा विखे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे, युवा नेते विवेक कोल्हे, कैलास बापु कोते, कैलासकाका भोसले, दत्तात्रय पाटील यांच्या शुभहस्ते होईल.
या धर्मनाथ बीज सोहळ्यासाठी भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आव्हान विजय जाधव, विश्वास जाधव, सौ विमल बोरसे, बाबासाहेब मांजरे, राहुल जाधव, अभिजीत जाधव, बाळकृष्ण मांजरे, सौ विद्याताई पाटील, सौ विलासी कदम, सौ ऐश्वर्या दिघे, चेतन कदम, सौ विजयमाला खैरनार, सौ राधिका पाटील, गोरक्ष बोरसे, सौ विश्वावती काळे, सौ रागिणी देशमुख, अडबंगीनाथ सेवा भक्त मंडळ, गोरक्षनाथ सेवा मंडळ, श्री स्वामी समर्थ सेवेकरी, श्री साई आनंदवल्ली मित्र मंडळ, जाणता राजा मंडळ, एवन मंडळ, न्यु इंग्लिश स्कूल शाळा, के. बी. रोहमारे काॕलेज, सर्व ग्रामस्थ व समस्थ भजनी मंडळ यांनी केले आहे.


.jpg)





