banner ads

संघटनात्मक कामातून विविध गुण आत्मसात करता येतात -- मा.आ.सौ.स्नेहलता कोल्हे

kopargaonsamachar
0

 संघटनात्मक कामातून  विविध गुण आत्मसात करता येतात -- मा.आ.सौ.स्नेहलता कोल्हे


भाजपा संघटन पर्व २०२५ सदस्य नोंदणी शुभारंभ


कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

भारतीय जनता पक्षाने नेहमी सबका साथ सबका विकास हे धोरण घेत काम केले आहे.आपणही मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने आपली भूमिका पार पाडतो आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी बूथ स्तरापासून भाजपाच्या विचाराचे कार्यकर्ते घडवण्यासाठी कार्य सुरू आहे.मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले उद्दिष्ठ गाठण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.स्व.शंकरराव कोल्हे,बिपीनदादा कोल्हे,विवेक कोल्हे आपण सर्वांची भूमिका ही लोकोपयोगी कार्याची राहिली आहे.भारतीय जनता पक्ष सदस्य वाढीसाठी देशव्यापी कार्यक्रम सुरू असून नव्या पिढीला देशाची सेवा करणारे विचार मिळण्यासाठी राजकीय सामाजिक व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी पक्षाच्या सदस्यांना वाव आहे.संघटनात्मक कामातून व्यक्तीला विविध गुण आत्मसात करता येतात त्यामुळे सामाजिक जाणीव जपण्यासाठी मदत होते असे प्रतिपादन मा.आ. सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले .


१ जानेवारी ते १५ जानेवारी यादरम्यान होणाऱ्या या संघटन पर्व अभियानाच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना भाजपसोबत जोडण्याचे ध्येय  ठेवण्यात आले आहे. कोपरगांव शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून भाजपा संघटन पर्व २०२५ सदस्य नोंदणीचा शुभारंभ मा.आ.सौ.स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते व उपस्थितीत मोठ्या उत्साहात या अभियानाला   सुरुवात करण्यात आली त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या
या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष कैलास राहणे,भाजपा शहराध्यक्ष डी.आर.काले, साहेबराव रोहोम,केशवराव भवर,विजय आढाव,दिपक चौधरी,विक्रम पाचोरे, अनिताताई गाडे,शहराध्यक्ष युवा मोर्चा सिद्धार्थ साठे,तालुकाध्यक्ष युवा मोर्चा अमोल गवळी,राजेंद्र सोनवणे,मुकुंद काळे,आकाश वाजे,जनार्दन कदम,अक्षय रोहकले,अमोल पेकळे,गोपीनाथ गायकवाड,शुभम पेकळे,प्रसाद आढाव,जगदीश मोरे,विजय चव्हाणके,सचिन सावंत,जयप्रकाश आव्हाड,रवींद्र डहाळे,नरेंद्र डंबीर,विजय जाधव,रोहित कणगरे,स्वप्नील मंजुळ, साई नरोडे,सद्दामभाई सय्यद,खालीकभाई कुरेशी,फकीर मोहम्मद पहिलवान,इलियास खाटीक,संतोष साबळे,लीयाकत सय्यद,रविंद्र लचुरे,संतोष नेरे,नसीरभाई सय्यद,सादिकभाई मनियार,मुन्ना दरपेल,रोहन दरपेल, बाळासाहेब राऊत,संजय जगदाळे,चंद्रकांत वाघमारे,सोमनाथ म्हस्के,निलेश बोराडे,मनोज इंगळे,देवरे,सिद्धार्थ पाटणकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    मा.आ.सौ.स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.

भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा आणि कार्याचा विस्तार करण्यासाठी पक्षाकडून सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने मूळ संघटना आणि इतर मोर्चा तसेच विविध सेलला पक्षाच्या वाढीसाठी सदस्य नोंदणीची जबाबदारी देण्यात आली असून महिला मोर्चा युवा मोर्चा ओबीसी मोर्चा या मुख्य मोर्चांसह इतर सेल व आघाड्यांना सदस्य नोंदणीच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना भाजपशी जोडण्याचं लक्ष देण्यात आले आहे ते यशस्वी करण्यासाठी कोपरगाव मतदारसंघ जोमाने काम करणार आहे असे मा.आ.सौ.स्नेहलता कोल्हे म्हणाल्या


.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!