कोपरगाव तालुक्यातील पाच हजार हून अधिक घरकुलांचे स्वप्न झाले साकार
हक्काचा पक्का निवारा उपलब्ध करून दिल्या बद्दल केंद्र आणि राज्य सरकार यांचे कोल्हेंनी केले आभार व्यक्त
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यात अधिकाधिक लाभार्थ्यांना घरकुल योजनांचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने मा. आ. स्नेहलता कोल्हे आणि युवानेते विवेक कोल्हे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. शासन अनेक योजना गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांच्या सुख सुविधेसाठी राबवत आहे. गतवर्षी १६०० आणि चालू वर्षात ३५४१ असे पाच हजाराहून अधिक कोटा घरकुल योजनेला प्राप्त झाल्याने हजारो लाभार्थ्यांना पक्के घर मिळण्यासाठी घरकुल योजनेचा लाभ होणार आहे.कोपरगाव तालुक्यातील अनेकांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी भरीव असा कोटा मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.
प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे अशी योजना राबवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना व्यापक स्वरूपात राबवली. या योजनेची अंमलबजावणी प्रत्येक गावात होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापक धोरण घेतले त्यानुसार हजारो लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळण्याचा ऐतिहासिक मंजुरीचा कोटा कोपरगाव तालुक्यासाठी आला आहे.
ड वर्ग यादीचा रखडलेला प्रश्न युवा नेते विवेक कोल्हे यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे मोर्चा काढत उचलला होता. वारंवार कोपरगाव तहसील येथे समस्या निवारण बैठकीत अधिकाऱ्यांना या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी व ऑटो डिलीट सारखी प्रक्रिया सुरू असताना त्यावेळी लाभार्थ्यांना वंचित रहावे लागेल असा नियम अडकाठी करू नका अशी विनंती प्रशासनाला केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वव्यापी धोरणामुळे कोपरगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी भरीव अशी ऐतिहासिक मंजुरी मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.



.jpg)




