पुस्तक हाच विद्यार्थ्याचा गुरु व्हायला हवा --उपजिल्हाधिकारी सायली सोळंके
वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस व वार्षिक पारितोषिक वितरण
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
शैक्षणिक जीवनात प्रत्येक पायरीवर पुस्तकांची गरज भासते. पुस्तके आपल्याला खूप गोष्टी शिकवतात तसेच आपल्या आयुष्यात नेहमी एक गुरु असायलाच हवा परंतु, प्रत्येक वेळेस गुरु भेटेलच असे नाही तेव्हा पुस्तक हाच विद्यार्थ्याचा गुरु व्हायला हवा असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी सायली सोळंके यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी-सुरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कै.सौ.सुशिलाताई ऊर्फ माईसाहेब काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली काळे या होत्या.
यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर तसेच राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर कोळपेवाडी ही विद्यालये मानाच्या फिरत्या करंडकाचे मानकरी ठरले.
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे, संभाजीराव काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरु कोळपे, उपाध्यक्ष बाळासाहेब ढोमसे, डॉ.आय.के.सय्यद, माता-पालक समितीच्या अध्यक्षा श्रीमती वहाडणे, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश चौरे, राधाबाई काळे कन्या विद्यालयाच्या प्राचार्या हेमलता गुंजाळ, श्री.छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, सुकदेव काळे, शेख सर, रमेश मोरे, पोपटराव येवले, सतीश नरोडे, भाऊसाहेब लुटे, बाबासाहेब आभाळे, उपमुख्याध्यापक मधुकर गोडे, पर्यवेक्षक सुरेश खंडिझोड, सचिव सिद्धार्थ कांबळे, सहसचिव नितीन बारगळ, निलेश डोंगरे आदी मान्यवरांसह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन बारगळ यांनी केले. स्मिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आभार सिद्धार्थ कांबळे यांनी मानले








