सामाजिक जाणीव निर्माण करणे हा राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश-प्राचार्य डॉ. माधव सरोदे
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर कोपरगाव तालुक्यातील रवंदे या ठिकाणी दिनांक ६ जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे. या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून रवंदे गावच्या सरपंच श्रीमती शोभा भवर या उपस्थित होत्या त्या आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाल्या 'महाविद्यालयीन युवकांनी खेड्यातील लोकांच्या साठी रचनात्मक कार्य केले पाहिजे ' या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे उपस्थित होते ते आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले 'महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करणे त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणणे हेच खरे राष्ट्रीय सेवा योजनेचे खरे उद्दिष्ट आहे.
भारत हा खेड्यांचा देश आहे खेड्यातील समस्या या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ' युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी ' हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित केले आहे.' या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम आधिकारी प्रा. डॉ. बी .ए . तऱ्हाळ यांनी केले. या समारंभासाठी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. मोहन सांगळे, कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अर्जुन भागवत आवर्जून उपस्थित होते त्याचबरोबर डॉ. बाळासाहेब वाघमोडे प्रा. डॉ. उज्वला भोर प्रा. डॉ. प्रतिभा रांधवणे प्रा. डॉ. देविदास रणधीर प्रा. डॉ. नामदेव चव्हाण प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रभाकर कदम हे आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी सवई यांनी केले तर प्रा. महेश दिघे यांनी आभार मानले.








